शिवसेना नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना हटवले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना हटवले

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिवसेनेचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांची या पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. नगर येथील बहुचर्चित बेकायदेशीर बायोडि

गुणदर्शन स्पर्धेत खिर्डी गणेशचे विद्यार्थी चमकले
राहुरी तालुक्यात दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण
भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर ; 80 टक्के झाला साठा, मुळा व निळवंडे प्रतीक्षेत

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिवसेनेचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांची या पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. नगर येथील बहुचर्चित बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणात दिलीप सातपुते यांचा आरोपींमध्ये समावेश झाल्याने त्यांची शिवसेनेच्या नगर शहरप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. नगर शहर प्रमुख पदाला स्थगिती देण्याबाबत शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातून अधिकृतपणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन शहर प्रमुखाची नियुक्ती लवकरच केली जाईल, असेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात बायोडिझेल प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यात 22 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यात दिलीप सातपुते यांचाही समावेश आहे. सातपुते सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने नगर शहर प्रमुख पदावरून त्यांना हटवले आहे.

COMMENTS