Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख पोतदार यांनी केला कर्तबगारांचा मानसन्मान

बीडची तरुणाई विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत असल्याचे मनस्वी समाधान-अनिल जगताप

बीड प्रतिनिधी - मागासलेला दर्गम भाग आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडला अवघ्या राज्यभरात ओळखल्या जाते. मात्र याच मागासलेल्या बीडचं रुपडं आत

कॉपीप्रकार थांबले नाहीत, तर राज्याचे वाटोळे
गाद्याच्या दुकानाला भीषण आग, दुकान पूर्णता जळून खाक | LOKNews24
बंगालमध्ये भाजपला झटका म्हणजे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? पहा ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | LokNews24

बीड प्रतिनिधी – मागासलेला दर्गम भाग आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडला अवघ्या राज्यभरात ओळखल्या जाते. मात्र याच मागासलेल्या बीडचं रुपडं आता बदलताना दिसू लागले आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच प्रत्येक क्षेत्रात आता बीडची तरुणाई आपले वर्चस्व प्रस्थापित करत दिसून येते आहे.
काल दि. 13 जुलै रोजी बीड येथे वांगीमधील आकाश काळे, पिंपळनेर इंद्रजीत ढेंगे, रांजणीचे लक्ष्मण माने यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि याबरोबरच दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी मा उदय जोशी यांचा मुलगा चि.सागर हा खखडएठ (इंडियन इन्स्टिटयूट सायन्स एडुकेशन  रेसर्च) या परिक्षेत पात्र ठरला असुन त्याची भोपाळ येथे जूनियर सायंटिस्ट पदी निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा शिवसेनेच्यावतीने बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार साहेब, जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्यासह बीड जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी एकत्रित येऊन सत्कार केला. कर्तृत्वान आणि गुणवंत असलेल्या आकाश काळे, इंद्रजीत ढेंगे, लक्ष्मण माने आणि सागर जोशी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आशिर्वाद दिले. दरम्यान शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार साहेब आणि जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी बीडची युवा पिढी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत असल्याचे पाहून याचा सार्थ अभिमान आणि समाधान असल्याची भावना व्यक्त केली. यानंतर चौसाळा येथील युवा सेनेचे किशोर वायभट यांचं हृदय सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार साहेब आणि जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या समावेत बीड शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

COMMENTS