तालिबान्याचा उठाव आणि काबूलचा पाडाव

Homeताज्या बातम्यासंपादकीय

तालिबान्याचा उठाव आणि काबूलचा पाडाव

अफगाणितस्तानच्या लष्करावर अमेरिका, ब्रिटनसह विविध देशांनी अब्जावधी डॉलर खर्च केले. मात्र त्यानंतर देखील अफगाणितस्तानचे लष्कर सक्षम होऊ शकले नाही. त्य

अमृत महोत्सवी वर्ष आणि विकासाचा आलेख
इंधन दरवाढ कपातीचे गौडबंगाल !
गुजरात निकालाचा अन्वयार्थ

अफगाणितस्तानच्या लष्करावर अमेरिका, ब्रिटनसह विविध देशांनी अब्जावधी डॉलर खर्च केले. मात्र त्यानंतर देखील अफगाणितस्तानचे लष्कर सक्षम होऊ शकले नाही. त्यामुळेच तालिबान्यानी केलेला हल्ला त्यांना पचवता आला नाही. नुसता हल्लाच पचवता आला नाही तर, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी व उपाध्यक्ष अमरुल्लाह सलेह यांना परागंदा होण्याची नामुष्की ओढवली. यातून अफगाणितस्ताने चित्र स्पष्ट होते.
गेल्या अनेक वर्षांपासून अफगाणिस्तान लष्कराच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले उचलत होता. त्यासाठी कोटयावधी रुपये खर्च करण्यात आले. अमेरिका आणि ब्रिटनकडून देखील अब्जावधी डॉलर खर्च करण्यात आले. तरी देखील काबूल सहजासहजी तालिबानच्या हाती लागल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. का अफगाणिस्तानच्या सैन्यांनी तालिबान्याचा कडवा प्रतिकार केला नाही. की सैन्यच तालिबान्याना सामिल होते. यासह अनेक प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागले आहे. तालिबान्यांनी काबूलचा पाडाव केल्यानंतर अशरफ घनी यांनी राजीनामा देत सत्तेची सूत्र शांततेने तालिबानला सोपवली आहेत. तेथे अली अहमद जलाली हे हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. तत्पूर्वी, तालिबान्यांनी जलालाबाद ताब्यात घेताच अमेरिकेच्या हेलिकॉप्टर्सनी अमेरिकन दूतावासावर लँडिंग केली. दूतावासाजवळ राजदूतांची सशस्त्र एसयूव्ही वाहने बाहेर येताना दिसली आणि त्यांच्या संरक्षणाची विमानांच्या घिरट्याही सतत सुरू होत्या. मात्र, अमेरिकन सरकारने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. दूतावासाच्या छताजवळ धूर उठताना दिसत होता. दोन अमेरिकन लष्करी अधिकार्‍यांच्या मते, राजदूतांनी संवेदनशील कागदपत्रे जाळल्यामुळे झाला हा धूर झाला. अमेरिकेने आपल्या दूतावासातील कर्मचार्‍यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. यासाठी सैनिकही पाठवण्यात आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या सैनिकांना येथून बाहेर काढण्याचा मोठा निर्णय घेतला. अफगाणिस्तानातील सत्तेतील परिवर्तन शांततेत होईल असे आश्‍वासन तालिबानने दिले आहे. आम्हाला कोणताही हिंसाचार नको आहे, सत्ता परिवर्तन शांततेत होणे देशाच्या हिताचे असल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. आमच्या सैनिकांना हिंसाचार करू नका असे आदेश वरिष्ठ नेत्यांकडून आले आहेत. आम्ही अफगाणिस्तानच्या जनतेचे सेवक आहोत. जनतेची संपत्ती, महिला-मुलांची सुरक्षितता आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. जनतेमध्ये घबराट पसरावी अशी आमची इच्छा नाही. पण शांतता राखण्याची जबाबदारी अफगाण सरकारवर असल्याचेही तालिबानने स्पष्ट केले. अफगाणिस्तानात रशिया हस्तक्षेप करणार नाही. परंतु संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत अफगाणिस्तानात या विषयावर तातडीने चर्चा घ्यावी, अशी मागणी रशियाच्या प्रतिनिधींनी केली आहे.तत्पूर्वी, तालिबानी सैन्य काबूलमध्ये घुसले. त्यांना प्रतिकार करण्यात आला नाही. तालिबानचे प्रतिनिधी काबूलमधील अध्यक्षीय प्रासादात सत्तांतराच्या वाटाघाटी करीत आहेत. अफगाणिस्तानमधील सत्तेतील सर्व महत्वाची पदे तालिबानने आपल्याकडे मागितली आहेत. अली अहमद जलाली यांच्याकडे तालिबानच्या हंगामी सरकारचे प्रमुख पद देण्यात येत असून अशरफ घनी यांनी अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखविली आहे. उर्वरित सत्ता पदांवर देखील तालिबानच्या वर्चस्वासह वाटाघाटी सुरू आहेत. तालिबानचा क्रमांक दोनचा नेता मुल्ला बरादर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्याशी सत्ता हस्तांतरणासाठी बोलणी करण्यासाठी आला होता. असे सांगितले जात आहे की, अली अहमद जलाली हे अफगाणिस्तानचे पुढील राष्ट्रपती असू शकतात. तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, ‘तालिबानला अफगाणिस्तानमध्ये पुढील काही दिवसांत शांततेने सत्ता हस्तांतरित करायची आहे.’काबूलचा पाडाव झाल्यानंतर अफगाणिस्तानातून तालिबानच्या भीतीने मोठ्या संख्येने नागरिकांनी पलायन सुरू केले आहे. तालिबानी फौज कलाकन, काराबाग आणि पगमन जिल्ह्यात आहेत. अतिरेक्यांनी यापूर्वी जलालाबादवर कब्जा केला होता. काबुलमध्ये मधून मधून गोळीबाराचा आवाजात येत होता. तालिबानने काबूलला लष्करी कारवाई करणार नसल्याचे म्हटले होते. तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते शांततेने सत्ता हस्तांतरणाची वाट पाहत आहेत. तालिबानने म्हटले की, कोणाच्याही जिवाची, मालमत्तेची, सन्मानाची हानी होणार नाही आणि काबूलच्या नागरिकांच्या जिवाला धोका होणार नाही. काबूलव्यतिरिक्त, जलालाबाद हे एकमेव मोठे शहर होते जे तालिबानच्या ताब्यातून वाचलेले होते. हे शहर पाकिस्तानच्या मुख्य सीमेजवळ आहे.

COMMENTS