बीड प्रतिनिधी - वेगवान निर्णय, गतीमान प्रशासन या ध्येयाने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेल्या विका
बीड प्रतिनिधी – वेगवान निर्णय, गतीमान प्रशासन या ध्येयाने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेल्या विकासाला चालना दिली आहे. आपल्या बीड विधानसभा मतदार संघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे विशेष लक्ष असते. विकास कामांसाठी निधी कधीही कमी पडणार नाही. हा विकास रथ असाच वेगाने चालेल. शिंदे सरकार म्हणजे सर्वसामान्यांना आपले वाटणारे सरकार आहे. लोकहिताच्या अनेक योजना मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी राबवल्या आहेत. यामध्ये शेतकर्यांना 6 हजार रु.मदत, महिलांना एस.टी.बस प्रवासात 50 टक्के सुट,वैद्यकिय मदत कक्षाच्या माध्यमातून लाखो रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केले आहे. त्यामुळे शिवसेना शाखांच्या माध्यमातून आपण सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य करावे आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे हात बळकट करावेत असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी शनिवारी बीड तालुक्यातील मौजे उमरद जहांगीर व तांदळवाडी भिल्ल येथे शिवसेना शाखा उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश बाप्पा उगले, बीड जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब मस्के, शहर प्रमुख कल्याण कवचट, गोवर्धन जिजा काशीद, उपतालुका प्रमुख विकास गवते, माजी उपसरपंच पांडुरंग गवते, दिनकर नवले, प्रकाश काशीद, कृष्णा सांगुळे, चंद्रकांत सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उमरद येथील शाखाप्रमुख दीपक कांबळे,बूथ प्रमुख विनोद आहेर, गावप्रमुख नितिन भांबे, गोरख लाटे, काळे रोहिदास, शिंदे आजिनाथ, तकीक अतुल हरिदास तकिक, राहुल भांबे आजिनाथ राजपुरे, अनुरोध वरवडेकर गवळीराम, चित्रे दीपक संदीप आहेर, बाबू भांबे, यांच्या सह तांदळवाडी भिल्ल येथील शाखाप्रमुख विशाल सांगुळे, बूथ श्रप्रमुख राज गाडे, गावप्रमुख विकास नगदे, आसाराम नगदे, राज गाडे, हरी भिसे, विशाल सांगुळे, कृष्णा सांगुळे, धनंजय सांगुळे, रोहिदास काळे, गोरख लाटे, रोहिदास आहेर, कचरू भांबे, भरत आहेर, बाळू कांबळे, सुभाष तांबे, दीपक शेळके, ऋतिक काळे, यांच्या सह गावातील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ ग्रामीण भागात पोहचवण्यासाठी तुमच्या सारख्या शिवसैनिकांची गरज आहे. राज्यातील एका मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत न आलेल्या विकास योजना मुख्यमंत्री शिंदे साहेबांंनी महिला वर्गासाठी एस.टी.बसच्या तिकिटामध्ये 50 टक्के सवलत दिलेली आहे. वैद्यकिय कक्षाच्या माध्यमातून लाखो रुग्णांना जीवदान दिलेले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठीच शिवसेना कार्यरत आहे. शिवसेनेने प्रत्येक घटकासाठी कार्य केलेले आहे. विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे व्हीजन हे व्यापक आहे. ग्रामीण भागाचा खर्या अर्थाने विकास शिवसेनाच पुढे असते. येणार्या काळात शिंदे साहेबांचे हात मजबुत करण्यासाठी आपण अधिकाधिक परिश्रम करण्याची गरज असल्याचे खांडे म्हणाले.शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाची जादु ग्रामीण भागात पसरली असून शेकडो युवकांचा, सक्रिय सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे ओढा वाढला आहे. बीड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात विकासाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण कायमच प्रयत्नशिल आहोत. प्रशासनाकडे विकास कामांबद्दल नेहमीच पाठपुरावा केला जात आहे. जनतेला पाहिजे तो विकास नक्कीच केले जाईल. विकास निधीसाठी आपण कुठेही कमी पडणार नाहीत. केतुरा येथील ही विकासाची कामे अधिक दर्जेदार पध्दतीने आणि वेगाने पुर्ण करण्यासाठी आपण स्वत: लक्ष देवूत असे जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले. गाव पातळीवरील विकासाचा अनुशेष भरुन काढण्याची जिम्मेदारी नक्कीच पार पाडू. प्रत्येक गावाला आणि प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल असे काम आपण सर्वजण करु दाखवू. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील विकास रथ वेगाने दौडत असल्याचे जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले.
COMMENTS