HomeUncategorized

Shevgaon : केदारेश्वर कारखान्याची ३२ वी ऑनलाइन वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न (Video)

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची सण २०२०/२१ सालची ३२ वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा क

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी तर्फे जाहीर निषेध
पाडेगाव जवळ प्रवासादरम्यान महिलेची बसमध्ये प्रसुती: बसमधील महिलांनी पुढाकार घेत केली प्रसूती
काँग्रेसचा विचार देशाला प्रगतीकडे नेणारा : आ. पृथ्वीराज चव्हाण

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची सण २०२०/२१ सालची ३२ वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष ऍड प्रतापराव ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली. मागील ३२ वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक संकटांना तसेच अडचणींना सामोरे जात आज कारखाना संस्थेचे संचालक मंडळ, कामगार, अधिकारी वर्ग, सभासद यांच्या सर्वांच्या माध्यमातून गेली पाच वर्ष केदारेश्वर कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने गाळप हंगाम यशस्वी पार पडत आहे. यावर्षी ५०० टनाने ऊस गाळप क्षमता वाढवलेली आहे. त्यामुळे किमान ३००० टन ऊस गाळप दरदिवशी होऊ शकते हा विश्वास आमच्या संचालक मंडळ व कामगारांचा आहे , असे प्रतिपादन संघर्ष योध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड प्रतापराव ढाकणे यांनी केले.कोरोनाने तसेच इतर कारणाने मृत्यूमुखी पडलेल्या कारखान्याचे सभासद, कर्मचारी व विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक,आणि  सीमेवर लढणाऱ्या जवानांना, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

COMMENTS