Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांचे आज शक्ती प्रदर्शन

माझा जनतेवर विश्‍वास असल्याचा केला दावा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात रविवारी अजित पवारांनी आपल्या सहकार्‍यांसह भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या निर्णयामुळे खळबळ उडाली, मात्र या बंडाला आमचा पाठिं

लोकशाही टिकवण्यासाठी …
अनाथांना नोकरी, शिक्षणामध्ये एक टक्के आरक्षण : ॲड. यशोमती ठाकूर
बंजारा ब्रिगेड च्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात रविवारी अजित पवारांनी आपल्या सहकार्‍यांसह भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या निर्णयामुळे खळबळ उडाली, मात्र या बंडाला आमचा पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्ट केले आहे. यासोबतच, खा.शरद पवार हजारो कार्यकर्त्यांसह आज सोमवारीकराडला जाणार आहेत. त्यानंतर ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. समाधीला अभिवादन केल्यानंतर पवार कार्यकर्त्यांना संबोधित करून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर आता भाजपने अजित पवारांना सत्तेत घेऊन त्यांना या घोटाळ्यातून मुक्त केले, अशी उपरोधिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोदींनी काही दिवसांपूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप केले. मग त्याच लोकांना पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी स्थान दिले. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्यामुळे मी पंतप्रधानांचा आभारी आहे. त्यांनी पक्षावरील आरोपाला मुक्त केले. आमच्या सहकार्‍यांनी जी पक्षाची भूमिका आहे, त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. उद्याच्या सहा तारखेला महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांची बैठक होती. त्या बैठकीत प्रश्‍न उपस्थित केले होते. त्याला विरोध करून त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष आहोत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. विधीमंडळातील काही भूमिका घ्यायची त्याचे कारण म्हणजे त्यांची नावे ईडी घोटाळ्यात आली होती. त्यामुळे त्यांनी वेगळे होणे स्विकारले. परंतू माझा महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेवर व युवकांवर विश्‍वास आहे. त्यामुळे आम्ही एक आहोत, आमची साथ तुम्हाला आहे. असे मत लोकांकडून व्यक्त केले जात आहे. जो प्रकार घडला, मला चिंता नाही, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.

बंडखोर आमदार परत येणार – शरद पवार म्हणाले, पक्षाच्या काही सदस्यांनी विशेषत: विधीमंडळाच्या सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली आहे, याचे चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांच्या समोर येईल. याचे कारण बंडखोरीमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यातील काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधला आहे. आम्हाला याठिकाणी निमंत्रित करून आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे. आमची भूमिका कायम आहे, याचा खुलासा अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांनी केला आहे. त्यामुळे याबाबत मी आताच काही बोलू इच्छित नाही. बंडखोरीबाबतचं अधिक स्पष्ट चित्र माझ्या इतकेच जनतेच्या समोर मांडण्याची आवश्यकता आहे. त्यांनी (बंडखोर आमदारांनी) जर त्यांची भूमिका जनतेसमोर मांडली तर त्याबद्दल माझा विश्‍वास बसेल. त्यांनी तशी भूमिका मांडली नाही, तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करणार – पक्षाच्या भवितव्याबद्दल तर आज जो प्रकार घडला आहे, तो इतरांसाठी नवीन असेल माझ्यासाठी नवीन नाही. मला आठवतेय, 1980 साली मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो. तेव्हा 58 आमदार निवडून आणले होते. पण एक महिन्यानंतर 58 पैकी 6 आमदारांव्यतिरिक्त सगळे आमदार पक्ष सोडून गेले. मी 58 आमदारांचा नेता होतो. त्यानंतर मी केवळ पाच आमदारांचा नेता झालो. त्या पाच लोकांना घेऊन मी पुन्हा पक्ष बांधायला महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुन्हा पक्षाची बांधणी करायची हाच माझा उद्देश होता. पाच वर्षांनी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीचे चित्र वेगळे होते. आम्ही अधिक जागा जिंकल्या होत्या असा दावाही पवारांनी यावेळी केला.

ही गुगली नसून रॉबरी ः शरद पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. मला आनंद आहे की, मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना शपथ दिली. म्हणजे त्यांनी हे मान्य केले की, हे सर्व आरोप खोटे होते. राष्ट्रवादी ही भ्रष्ट्राचारी नाही हे सिद्ध झाले. त्यामुळे मी पंतप्रधानांचे आभार मानतो, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. भाजपमधून सातत्याने राष्ट्रवादी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आजच्या बंडखोरीचे श्रेय पंतप्रधान मोदींना द्यावे लागेल. या आधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहाटेच्या शपथ विधीवेळी मी गुगली टाकली होती असे शरद पवार म्हणाले होते. मात्र आता ही गुगली नाही रॉबरी आहे, असे पवारांनी म्हटले आहे.

COMMENTS