Homeताज्या बातम्यादेश

उत्तर भारतात अतिवृष्टीचा प्रकोप

हिमाचलमध्ये अतिवृष्टीने 95 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, हा पाऊस काही थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे

जिल्हाप्रमुखाच्या खिशातील 50 हजार चोरणाऱ्याला अटक |
लग्न अटपून परतणाऱ्या गाडीचा अपघात, १५ जण जखमी | LokNews24
कोरोना संकटात नीलेश लंके यांची ऐतिहासिक कामगिरी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, हा पाऊस काही थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, विविध शहरे आणि गावांना पाण्याने वेढा दिल्यामुळे देशातील 18 राज्यांमध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हिमाचल प्रदेशात 12 जिल्हे पाऊस आणि पुरामुळे प्रभावित झाले आहेत. हिमाचल प्रदेशात पावसामुळे आतापर्यंत एकूण 95 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 लोक बेपत्ता आहेत, तर 99 जण जखमी आहेत.
देशातील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून मोठे नुकसान झाले आहे. तर 16 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तर 497 जण जखमी झाले आहेत. पावसामुळे 8644 गुरेही दगावली आहेत. 8815 घरांचे नुकसान झाले आहे, तर 47,225 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर भारतातील उत्तराखंड, पंजाब, हिमाचलप्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार सुरूच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये दोन दिवसांनी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिमला, सिरमौर, किन्नौरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. भूस्खलनामुळे गंगोत्री आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद आहेत. येथे 3 ते 5 हजार लोक अडकले आहेत. दिल्लीतील जुन्या रेल्वे पुलावर यमुना नदीच्या पाण्याची पातळी 207.2 मीटर ओलांडली आहे. हरियाणातील हातिनी कुंड बॅरेजमधून 3.21 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने राजधानीत पुराचा धोका वाढला आहे. गेली चार दिवस अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आतापर्यंत हिमाचल प्रदेश 95, उत्तर प्रदेश 34, जम्मू-काश्मीर 15, उत्तराखंड 9 आणि दिल्ली 5 अशी आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित केली आहे. हिमाचलच्या चंद्रतालमध्ये 250 पर्यटक अडकले आहेत. 8 तास पाऊस थांबला तर सर्वांची सुटका होईल, असे मुख्यमंत्री सखू यांनी म्हटले आहे.सोलनमध्ये दरड कोसळून दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, चंदीगड-शिमला आणि चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग अंशतः खुले करण्यात आले आहेत. हरिद्वारमधील तिबडी येथे रेल्वे रुळ तुटल्याने अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे.दिल्लीतील चाणक्य पुरी परिसर जलमय झाला आहे. काही मुत्सद्दी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या घरातही पाणी शिरले. हरियाणातील 9 जिल्ह्यांतील 600 गावे जलमय झाली आहेत. अंबाला 40 टक्के पाण्याखाली आहे. चंदीगड-अंबाला महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याचबरोबर अंबाला-कैथल-हिसार राष्ट्रीय महामार्ग अजूनही ठप्पच आहे. डोंगराळ भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यातील चंद्रताल येथे मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीमुळे 300 पर्यटक अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या आपत्तीत गेल्या तीन दिवसांत राज्यात 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर मंडी, कांगडा आणि लाहौल स्पितीमध्ये चार जण बेपत्ता आहेत. त्याचवेळी, उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मंगळवारी भूस्खलनामुळे पाच पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. 14,100 फूट उंचीवर असलेल्या चंद्रताल येथील कॅम्पमध्ये 300 हून अधिक पर्यटक अडकले आहेत. मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे ते परत येऊ शकत नाहीत. त्यांना हेलिकॉप्टरने वाचवण्याचे आवाहन प्रशासनाने हवाई दलाला केले आहे.

घरांसह पिके पाण्याखाली – हरियाणा, पंजाब आणि हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे घरांसह पिके पाण्याखाली गेले आहेत. कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या राज्यांमध्ये अनेक घरे पाण्याखाली गेली असून पिकांचे नुकसान झाले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. रुपनगर, पटियाला, मोहाली, अंबाला आणि पंचकुला यासह बाधित जिल्ह्यांमध्ये मदतीसाठी केंद्र उभारण्यात आली आहेत. पंजाबमधील सर्वाधिक प्रभावित रुपनगर जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

COMMENTS