Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवार पुन्हा नाशिकच्या होम पिचवर

१४ मतदार संघाचा घेतला आढावा १५ ऑगस्टपासून दौरा

नाशिक प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक केंद्रस्थानी ठेवत बुधवारी (दि. २६) दिल्लीत जिल्ह्याती

वय काढू नका, हा गडी थांबणार नाही
राज्यपाल कोश्यारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या – शरद पवार
अजित पवार गटावर कारवाई करा

नाशिक प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक केंद्रस्थानी ठेवत बुधवारी (दि. २६) दिल्लीत जिल्ह्यातील १४ मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यानंतर देवळाली मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे यांच्या जागेवर तत्काळ उमेदवार शोधण्याच्या सूचना पवार यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांनी दिली.

दि. १५ ऑगस्टपासून शरद पवार पुन्हा नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून, यावेळी भाजप, शिवसेनेतील (शिंदे गट) अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिकचा दौरा करीत येवल्यात सभा घेत शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर पवार यांनी बुधवारी (दि. २६) नाशिकचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, दत्तात्रय माळोदे यांना बोलावून घेत नाशिक शहरासह जिल्ह्यातील १४ विधानसभा 

मतदारसंघांचा आढावा घेतला. कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे याबाबत विचारणा करीत पदाधिकाऱ्यांशी लोकसभा व विधानसभानिहाय चर्चा केली. अजित पवार यांच्या मागे किती आमदार आहेत हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. जिल्ह्यातील छगन भुजबळांपाठोपाठ पाचही आमदारांनी अजित पवारांना साथ दिली. देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्याबाबत संभ्रम होता. मात्र, नंतर त्या अजित पवार गटात सहभागी झाल्या. त्यामुळे शरद पवार यांनी येवल्यानंतर आता देवळाली मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. चार इच्छुकांची नावेदेखील त्यांनी मागून घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय झालेल्या बैठकींचे सादरीकरण केले.

पक्षाध्यक्ष पवार यांनी विशेषतः देवळाली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. काय परिस्थिती राहील याबाबत विचारणा केली. या मतदारसंघातून कोण कोण तयारी करीत आहेत याबाबतदेखील त्यांनी विचारणा केली. -गोकुळ पिंगळे, माजी नगरसेवक

COMMENTS