Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदीप कुरुलकरांनी महिलांचे लैंगिक शोषण

एटीएसच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी स्पष्ट

पुणे/प्रतिनिधी ः डीआरडोओचे संचालक प्रदीप कुरूलकर सध्या पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून तुरुंगात असून, त्यांच्या चौकशीदरम्यान अने

बॉम्बची खोटी माहिती दिल्यास 1 कोटीपर्यंतचा दंड :केंद्र सरकारचा निर्णय
कोपरगाव पीपल्स बँकेचे येवला शाखेचे नवीन सुसज्ज वास्तूत स्थलांतर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांदवड तालुकाध्यक्षपदी रघुनाथ आहेर  

पुणे/प्रतिनिधी ः डीआरडोओचे संचालक प्रदीप कुरूलकर सध्या पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून तुरुंगात असून, त्यांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येतांना दिसून येत आहे. कुरुलकर यांनी डीआरडीओतील कामाची कंत्राटे देताना दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याच समोर आले आहे. एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.  
डीआरडीओचे संचालक असताना प्रदीप कुरुलकरांचे कारनामे आता समोर येत आहे. कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमांची गोपनीय माहिती दिल्याचा आरोप तर आहेच पण याच कुरुलकरांनी डीआरडीओचे संचालक असताना दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचेही समोर आले आहे. डीआरडीओचे संचालक असताना डीआरडीओच्या कॅम्पसमधील वेगवगेळ्या कामांची कंत्राटे देण्याचे अधिकार प्रदीप कुरुलकरना होते. मात्र ही कंत्राटे देताना त्यांनी दोन महिलांचे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर त्यांना कंत्राट दिल्याचे पीडित महिलांनी दिलेल्या जबानीत म्हटले आहे. एटीएसने प्रदीप कुरुळकरना अटक करून जेव्हा तपास सुरु केला, तेव्हा कुरुलकरांच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप चॅट आढळून आले. कुरुलकरांनी मागील वर्षभरात जिथे जिथे प्रवास केला होता तिथे एटीएसने तपास केला. या तपासामध्ये मुंबईतील कलिना इथल्या गेस्ट हाऊसमध्ये कुरुलकर वेगवेगळ्या सहा महिलांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. या महिलांचा माग काढत एटीएसने त्यांची चौकशी केली असता त्यापैकी दोन महिलांनी कुरुलकरांनी लैंगिक शोषण केल्याचे एटीएसला सांगितले आहे. प्रदीप कुरुलकर झारा दास गुप्ता या बनावट नावाने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून चालवल्या जाणार्‍या हनी ट्रॅपमध्ये अडकले. पण त्या आधी डीआरडीओचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी अनेकांना ट्रॅपमध्ये अडकवले होते. डीआरडीओच्या वर्तुळात कुरुलकरांची एक रंगेल अधिकारी अशीच प्रतिमा तयार झाली होती. या सर्व गोष्टींची आणि कुरुलकरांच्या सवयींची माहिती काढून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेंनी कुरुलकरांना जाळ्यात अडकवायचे ठरवले. इतर कोणता अधिकारी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या जाळ्यात का नाही अडकले ? कुरुलकरच का अडकले? याच उत्तर कुरुलकरांच्या या सवयींमध्ये दडले आहे. झारा दास गुप्ताने क्षेपणास्त क्षेत्रात अभ्यास करणारी एक विद्यार्थिनी म्हणून प्रदीप कुरुलकरांशी संपर्क केला. तुम्ही मला डॉक्ट्रेट मिळवण्यासाठी मार्गदर्शन करा, अशी विनंती तिने कुरुलकरांना केली. पुढे दोघांमध्ये क्षेपणास्त्र मोहिमेबरोबरच खाजगी विषयांवर देखील संवाद सुरु झाला. पुढे तो एकमेकांना बेब आणि हनी म्हणण्यापर्यंत पोहचला. एकीकडे लंडनमध्ये बसलेल्या झारा दास गुप्ताशी कुरुलकरांचे असे चॅटिंग सुरु होते तर दुसरीकडे इथे भारतात त्याच काळात कुरुलकर सहा वेगवगेळ्या महिलांना डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये भेटत होते.

एटीएसकडून तपास सुरू – कुरुलकरांना अटक केल्यानंतर त्यांनी कोणती गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राला दिली आहे आणि ते त्यासाठी कोणाला भेटलेत याचा तपास एटीएसने सुरु केला. हा तपास राष्ट्रीय सुरक्षेच्या अंगाने जाणारा होता. मात्र या तपासात करुळकरांच्या व्यक्तिमत्वाची रंगीबेरंगी अंग उघडी होऊ लागली. मात्र दुर्दैव हे की भारतीय सैन्यदलांसाठी तंत्रज्ञान विकसित करणार्‍या, क्षेपणास्त्र मोहिमांची आखणी करणार्‍या डीआरडीओसारख्या नामवंत संस्थेच्या आवारात हे प्रकार घडत होते. आपण किती महत्वाच्या संस्थेचं नेतृत्व करतो आहोत याचे कुरुलकरांचे भान सुटले होते हेच यातून स्पष्ट झाले आहे.

COMMENTS