Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथे वीज पडून एक बैल व एक पारडू ठार

  नाशिक प्रतिनिधी - गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट सदृश्य अवकाळी पाऊस झाल

गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस कमकुवत ठरत आहेत का – सुषमा अंधारे  
तब्बल 8 वर्षांनी हुर्रे : कोळे येथील शर्यतीत सैदापूरची बैलगाडी पहिली
कोरोना संक्रमणाचा आलेख चढताच ; देशात एका दिवसात 1 लाख 94 हजार नवे रुग्ण

  नाशिक प्रतिनिधी – गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट सदृश्य अवकाळी पाऊस झाला आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान मुरंबी येथील शेतकऱ्यांच्या घराजवळ वीज पडून एक बैल आणि एक म्हैशीचे पारडू ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

          गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात विजेच्या गडगडाटा सह जोरदार वारे , पाऊस आणि गारपीट होत असून या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीमालाचे नुकसान केले आहे. गहू, हरभरा, कांदे, द्राक्षबागा व इतर भाजीपाला पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज सकाळीही वाडीव-हे, मुरंबी, सांजेगाव या परिसरामध्ये विजेचा गडगडाट होत होता. मुरंबी येथील शेतकरी शिवराम गणपत मते यांच्या भंबाळे फाटा येथील शेत वस्तीवर सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घराजवळच बांधलेले एक बैल व एका म्हशीचे दीड वर्षाचे पारडू त्यावर वीज कोसळल्याने त्यात ते ठार झाले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मुरंबी गावचे सरपंच उपसरपंच तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी करून मयत जनावरांचा पंचनामा केला.

          अवकाळी पावसाने पिकांबरोबरच शेतकऱ्यांच्या जनावरांवरही घाला घातल्याने शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. यावेळी पंचनामा करतेवेळी घटनास्थळी मुरंबीचे सरपंच बापू मते, माजी उपसरपंच संतोष मते, सामाजिक कार्यकर्ते भास्कर त्रंबक मते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश नेहते, कोतवाल सुधाकर गोवर्धने आदी उपस्थित होते.

COMMENTS