Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.शशांक कराळे यांनी रुग्णांप्रती सेवाभाव जपावा-आ.प्रकाश सोळंके

माजलगाव प्रतिनिधी - आत्याधुनिक सुसज्ज हॉस्पिटलची येथे उभारणी करून डॉ.कराळे यांनी माजलगावात रुग्णांची उत्तम सोय केली आहे.ही खूप चांगली बाब आहे.त्य

परिणीती चोप्रानंतर आता कंगना रनौत अडकणार विवाह बंधनात ?
समाजवादी आणि उध्दव ठाकरे !
आरोग्य विभागात 2 हजार पदे भरणार

माजलगाव प्रतिनिधी – आत्याधुनिक सुसज्ज हॉस्पिटलची येथे उभारणी करून डॉ.कराळे यांनी माजलगावात रुग्णांची उत्तम सोय केली आहे.ही खूप चांगली बाब आहे.त्यांनी रुग्णांप्रती येथे सेवाभाव जपावा,परमेश्वर आयुष्यात त्यांना काहीच कमी पडू देणार नाही.असे सुतोवाचन आ.प्रकाश सोळंके यांनी नवजीवन हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी केले.
तर दिल्ली सारख्या ठिकाणी वैद्यकीय सेवा केलेल्या डॉ. कराळेंचा येथील रुग्णांना निश्चित मोठा फायदा होणार असल्याची ग्वाही डॉ.प्रकाश आनंदगावकर यांनी यावेळी दिली.दरम्यान अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी नवजीवन हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर मा.आ. मोहनराव सोळंके,मा.आ.केशवराव आंधळे,मोहनराव जगताप रमेशराव आडसकर,बाबुराव पोटभरे,अशोक डक,जयसिंह सोळंके,सहाल चाऊस,कुंडलिक खाडे,शिवाजी रांजवण यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आ.प्रकाश सोळंके बोलत होते. मागच्या पंधरा वर्षात शहरात झपाट्याने विकास होत आहे.धरण उभारणी, एमआयडीसी,दोन राष्ट्रीय महामार्ग, पतसंस्थांचे जाळे यामुळे उद्योगधंदे याठिकाणी वाढत आहेत.अशा विकसनशील शहरात नवजीवन सारख्या सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी ही चांगली बाब आहे. डॉ.कराळेंनी येथे रुग्णांप्रती सेवाभाव ठेवावा.ईश्वर त्यांना आयुष्यात काहीच कमी पडु देणार नाही.शहराच्या बदलत्या चित्रावर बोलत डॉक्टरांच्या येथे येण्याचे कौतुक करत त्यांनी यावेळी डॉक्टरांना सल्लाही दिला. माजलगावचे लोक चांगले आहेत ते तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाहीत.अशी हामीही यावेळी आ. सोळंकेंनी बोलून दाखवली.तर बिहार,दिल्ली येथिल वेदांत हॉस्पिटल सारख्या मोठ्या हॉस्पिटल मधून काम केलेल्या डॉ. कराळेंचा अनुभव येथील रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास डॉ.प्रकाश आनंदगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना व्यक्त केला.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले होते.दरम्यान डॉ.शशांक कराळे,डॉ.परमेश्वर खोडके, डॉ.राहुल राठोड,डॉ.युवराज कोल्हे, डॉ.गणेश केदारा डॉ.अमोल परतुरकर,डॉ.शिशिर वाय.खासे, डॉ.मयुरी डक,डॉ.लक्ष्मीकांत यादव, इत्यादी स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या उपस्थितीत शेकडो रुग्णांनी यावेळी आपल्या आरोग्य तपासण्या केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक वाडेकर यांनी केले.तर आभार अक्षय सरोदे यांनी मानले.कार्यक्रम स्थळी परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

COMMENTS