बाल विवाह लावल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाल विवाह लावल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील अल्पवयीन मुलीचा इच्छेविरोधात खारेकर्जुने येथील मुलाशी बालविवाह लावल्याप्रकरणी मुलीच्या तक्रारीव

केडगाव येथून तरुणी बेपत्ता
20 लाखाचे आमीष दाखवून 17 लाखाला घातला गंडा…
अण्णा हजारेंनी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान ऊर्जादायी ः विद्या पवळे

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील अल्पवयीन मुलीचा इच्छेविरोधात खारेकर्जुने येथील मुलाशी बालविवाह लावल्याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून मुलीच्या आई-वडिलांसह सातजणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जून रोजी या अल्पवयीन मुलीचा खारेकर्जुने येथील तरुण अक्षय सुखदेव मगर याच्याशी बौद्ध पद्धतीने नवनागापूर येथे विवाह लावण्यात आला. परंतु आपल्या इच्छेविरोधात व गुपचूप घरच्यांनी लग्न लावल्याची तक्रार संबंधित मुलीने चाईल्ड लाईन संस्थेशी संपर्क करून केली. चाईल्डलाईनचे शाहीद शेख, मंजुषा गावडे यांनी पुढाकार घेऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी पीडित मुलीला हजर केले. या प्रकरणी नवनागापूरचे ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अल्पवयीन मुलीशी इच्छेविरोधात लग्न लावल्याप्रकरणी वर अक्षय सुखदेव मगर, त्याची आई रंजना सुखदेव मगर, वडील सुखदेव मगर या तिघांसह मुलीचे आई-वडील व चुलते-चुलती अशा सातजणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS