बीड प्रतिनिधी - लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांनी त्यांच्या हयातीत बहुजन समाजा सह मराठा समाजा साठी मोठे योगदान दिले आहे. येत्या 30 जून रोजी स्व.
बीड प्रतिनिधी – लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांनी त्यांच्या हयातीत बहुजन समाजा सह मराठा समाजा साठी मोठे योगदान दिले आहे. येत्या 30 जून रोजी स्व. विनायकराव मेटे साहेबांची प्रथम जयंती साजरी करण्याचा मानस त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहत्यांनी केला आहे . स्व. मेटे साहेबांनी समाजकारण करत असताना कधीही पक्ष , जात, धर्म पाहिला नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व पक्ष, संघटना व सर्वधर्मीय लोकांनी एकत्र येत स्वर्गीय विनायकराव मेटे यांचा पूर्णाकृती पुतळा बीड जिल्ह्याच्या ठिकाणी असावा यासाठी शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय व्यापक बैठक संपन्न झाली.
लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे सामाजिक कार्य महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. या कार्यातून त्यांनी आपल्या हयातीत महाराष्ट्रभर जिल्हा जिल्ह्यात तालुक्यात त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले आहेत महाराष्ट्रभर उंची असलेल्या या बीड जिल्ह्यातील नेत्याचे भव्य पुतळा जिल्ह्याच्या ठिकाणी असावा असा मानस जिल्ह्यातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी केला आहे यासाठी काल दि. 31 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे व्यापक स्वरूपाची बैठक संपन्न झाली या बैठकीत एकमुखाने स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या कार्याला शोभेल असा त्यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीस अनिल जगताप, रमेश पोकळे, प्रभाकर कोलांगडे, अशोक हिंगे, शेख शफीक, सि. ए. बी. बी.जाधव, शेख निजाम, रमेश चव्हाण, सुनील सुरवसे, अशोक ठाकरे, शामराव पडूळे, नितीन धांडे, मंगेश पोकळे, भास्करराव गायकवाड, राहुल वायकर, सुनील अनभुले, विनोद चव्हाण, सुहास पाटील ,अनिल घुमरे, मनोज जाधव,
COMMENTS