Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंधुतेचे तत्वज्ञान माणूस जोडण्यास शिकवते – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे ः महापुरुषांचे विचार समाजाला जोडणारे, देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारे आहेत. मात्र, प्रत्येक जाती-धर्माने महापुरुष वाटून घेण्याची स्पर्धा ला

महाराष्ट्र हादरला ! अवघ्या 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
सीसीटीव्ही मशीनसह लाखोंची चोरी…पुरावाच केला गायब
राणांना तिकीट दिल्यास बंड करू ः बच्चू कडू

पुणे ः महापुरुषांचे विचार समाजाला जोडणारे, देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारे आहेत. मात्र, प्रत्येक जाती-धर्माने महापुरुष वाटून घेण्याची स्पर्धा लागल्याचे दिसते. जाती-धर्माच्या नावावर समाजात दुफळी निर्माण होत असताना बंधुतेचा विचार पेरण्याची गरज आहे. कारण बंधुता माणूस जोडण्याचे तत्वज्ञान शिकवते असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या संस्थाच्या वतीने नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात 24 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचा समारोपावेळी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक कुमार पगारिया, स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अरुण आंधळे, प्रकाश जवळकर, प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण आदी उपस्थित होते. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, अनेक महापुरुष संघर्षासाठी वापरले जात आहेत. अशावेळी प्रकाश रोकडे बंधुतेची पताका खांद्यावर घेऊन गेली पाच दशके समाजात बंधुता पेरण्याचे काम करत आहेत. चंद्रकांत दळवी म्हणाले, बंधुतेच्या नावाने मिळालेला पुरस्कार विशेष आहे. ’गर्व से कहो बंधू है’ हा नारा घेऊन रोकडे गेली 50 वर्षे बंधुतेची चळवळ व्यापक करत आहेत. प्रशासनात काम करताना मी ही बंधुभावाच्या विचारातून काम केले. हा विचार आणखी व्यापक करण्यासाठी चळवळीला जोडून घेतले आहे. माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटचे संस्थापक संचालक ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. दीपक शहा यांना ’राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ देऊन डॉ. सबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. दळवी व शहा यांनी पुरस्काराच्या रकमेत प्रत्येकी 11 हजार रुपये घालून 32 हजारांचा निधी बंधुता परिषदेला सुपूर्त केला. पुढील वर्षी होणार्‍या 25 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ, तर स्वागताध्यक्ष पदी बंधुता प्रकाशनाच्या संचालिका मंदाकिनी रोकडे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. बंधुता मायमराठी पुरस्काराने मधुराणी बनसोड (वाशिम), सीमा गांधी (पिंपरी), सचिन शिंदे (उमरखेड), तुकाराम कांबळे (नांदेड), तेजस गायकवाड (सोलापूर), नरेंद्र पाटील (धुळे), साईनाथ फुसे (औरंगाबाद), घनशाम सावरकर (परभणी), प्रतिभा मगर (पुणे) व महादेव सुरवसे (परळी वै.) यांना सन्मानित करण्यात आले.

COMMENTS