Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवोदय परीक्षेत श्रुतिका झगडेची निवड

श्रीगोंदा शहर : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी श्रुतिका सचिन झगडे

द सेवा मंडळाच्या सेवक प्रतिनिधी निवडणुकीत प्रगती पॅनलची बाजी
कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयासाठी एच.आर.सीटी. मशिन उपलब्ध करुन द्यावे : कोल्हे
आमदार काळेंच्या पुढाकारातून कोपरगावची बाजारपेठ फुलणार

श्रीगोंदा शहर : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी श्रुतिका सचिन झगडे हिची नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्‍वरसाठी निवड झाली. नवोदय विद्यालयासाठी शहरी विभागातून तीन विद्यार्थ्यांमध्ये श्रुतिकाची निवड झाली आहे.
श्रुतिकाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढळगाव या ठिकाणी झाले असून तिने गेल्या वर्षी झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर वेशभूषा स्पर्धेत महाराणी तारा राणीची भूमिका करून उपस्थितांची मने जिंकून प्रथम क्रमांक पटकावला होता. श्रुतिका फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सचिन झगडे व शिक्षिका शारदा झगडे यांची कन्या आहे. कन्या विद्यालयातील नवोदय विभाग प्रमुख विकास चव्हाण, कुंदन खामकर, पुष्पा घोडे, जयश्री कुदांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. श्रुतिकाच्या या यशाबद्दल विद्या कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता चौधरी, उपमुख्याध्यापिका निलीमा कातोरे, जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल जगताप, आमदार बबनराव पाचपुते उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS