Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सागर बोबडेची लेफ्टनंट पदावर निवड

राहुरी प्रतिनिधी ः डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी सागर दत्तात्रय बोबडे यांची केंद्रीय लोकसेवा आय

निरोगी व सदृढ आरोग्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन काळाची गरज -संजय सपकाळ
काँग्रेसचे मुक्कामी आंदोलन आश्‍वासनानंतर स्थगित ; आंदोलकांवर गुन्हा दाखल, मनपा ऑक्सिजन बेड सुविधा करणार
नवमतदारांनी केले खासदार डॉ.सुजय विखे स्वागत

राहुरी प्रतिनिधी ः डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी सागर दत्तात्रय बोबडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणार्‍या सीडीएस परीक्षेमध्ये यश प्राप्त करून भारतीय लष्कराच्या लेफ्टनंटपदी निवड झाली.
सागर बोबडे हे सांगली जिल्हयातील वाळवा या गावातील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद शाळा मध्ये झाले, त्यांनतर माध्यमिक शिक्षण हे आदर्श बालक मंदिर हायस्कूल इस्लामपूर येथून झाले. त्यांनी पुढील पदवीचे शिक्षण हे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय,  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून कृषी अभियांत्रिकीमधून 2020 मध्ये पूर्ण केले. ते सुरवातीपासून कृषी अभियांत्रिकी फोरम राहुरी मध्ये सहभागी होते. त्यांच्या या यशामध्ये कृषी अभियांत्रिकी फोरम चा खुप मोठा वाटा आहे. वेळोवेळी मिळालेले सीनिअरचे मार्गदर्शन आणि फोरम ने आयोजित केलेले मार्गदर्शन शिबीर याचा खूप फायदा परीक्षेची तयारी करताना झाला. राहुरीमध्ये त्याच्या विविध खेळ जसे टेबल टेनिस, हॉकी आणि फुटबॉलमध्ये  सहभाग होता.

COMMENTS