Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. शिवाजी काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः येथील बोरावके नगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे ग्रामीण विनोदी कथाकार व राहाता येथील शारदा कनिष्ठ महाविद्यालया

राज्यात 2 ऑक्टोबरला ग्रामसभा होणार नाहीत, ग्रामसेवक युनियनची भूमिका
समता स्कूलच्या आस्वाद मेस विभागाला आयएसओ मानांकन
पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं, गोपीचंद पडळकरांचा तुफान हल्ला l पहा LokNews24

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः येथील बोरावके नगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे ग्रामीण विनोदी कथाकार व राहाता येथील शारदा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. शिवाजी एकनाथ काळे यांना शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकदिनी 05 सप्टेंबर 2023 रोजी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली.
   विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी 30जानेवारी 2018रोजी स्थापन झाली. समाजातील सेवाभावी आणि कार्यकर्तृत्वशील व्यक्तींना सन्मानित करीत असते. शिक्षक दिन हा शिक्षक जीवनातील एक सन्मान दिवस आहे, अशा शैक्षणिक कार्यात समर्पित झालेले, साहित्यिक क्षेत्रात नावलौकिक असलेले प्रा. डॉ. शिवाजी काळे ह ऑकटोबर 2023रोजी रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निरपेक्ष जीवनकार्याचा सन्मान म्हणून डॉ. शिवाजी काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके, मार्गदर्शक, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये, संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे इत्यादींनी  त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS