नाशिक - भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्यावतीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेवून नाशिक शहरात होत असलेल्या सैय्यद रेहान अली (खान) याच्य

नाशिक – भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्यावतीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेवून नाशिक शहरात होत असलेल्या सैय्यद रेहान अली (खान) याच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कॉमेडी शो वर बंदी घालावी उदया दि.२६ ऑगस्ट २०२३ रोजी नाशिक मधील लिफ कॅफे येथे कार्यक्रम होणार असून हा समाज कंटक सोशल मिडीयाच्या माधमातून भारतीय सैन्य (आर्मी) व हिंदु युवतींच्या नावाने आक्षेपार्ह विधान करत असून यामुळे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन नाशिक शहरातील शांतता खंडीत होऊ शकते. पोलीस प्रशासनाने त्वरीत या विषयाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून उदया होणारा शो वर बंदी घालावी असे लेखी निवेदन देवून मागणी केली आहे. अन्यथा भारतीय जनता पार्टी हा शो बंद पाडेल व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असे भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले आहे.
या निवेदन देते प्रसंगी ॲड.श्याम बडोदे, ॲड.अजिंक्य साने, अमित घुगे, देवदत्त जोशी, योगेश हिरे, रविंद्र गांगुर्डे उपस्थित होते.
COMMENTS