Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात जाणीवपूर्वक दंगे करणार्‍यांना सोडणार नाही : ना. शंभूराज देसाई

कराड / प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या अमरावती, नांदेड आणि मालेगाव परिसरात झालेली दंगली पोलिसांनी वेळेत नियंत्रणात आणलेल्या आहेत. येथे झालेल्या दंगल

जमिन खरेदीप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरेविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
कुडाळच्या कुंभार समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे स्वागत
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

कराड / प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या अमरावती, नांदेड आणि मालेगाव परिसरात झालेली दंगली पोलिसांनी वेळेत नियंत्रणात आणलेल्या आहेत. येथे झालेल्या दंगली पूर्वनियोजित नसल्याचा निष्कर्ष कोणी काढला हे माहिती नाही. मात्र, दंगेखोरांची ओळख पटलेली आहे. जाणिवपूर्वक दंगे करणार्‍या दंगलखोरांना पोलिस सोडणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
कराड येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात दंगल काबुत करण्यात सरकारला अपयश आले असा आरोप चुकीचा असून वेळेत जादा कुमकेसह पोलीस अधिकारी घटनास्थळी चोवीस तास हजर होते.
अ‍ॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांची कमराबंद चर्चा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुक पार्श्‍वभूमीवर उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना भेटण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आले होते. कराड येथील बाजार समितीत जवळपास अर्धा ते पाऊण तास कमराबंद चर्चा झाली. रविवारी जिल्हा बँकेसाठी मतदान असल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यावेळी बैठकीस जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, प्रा. धनाजी काटकर
आदी उपस्थित होते.

COMMENTS