Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘जनशताब्दी’चा आता हिंगोलीपर्यंत विस्तार

छ. संभाजीनगर ः शहरासाठी सुरू करण्यात आलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा सुरुवातीला जालना आणि आता हिंगोलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. येत्या 10 मार

विरोधी पक्षनेते दानवे आणि पालकमंत्री भुमरेंमध्ये जुंपली  
नामांतराविरोधात 37 हजारांवर आक्षेप
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage

छ. संभाजीनगर ः शहरासाठी सुरू करण्यात आलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा सुरुवातीला जालना आणि आता हिंगोलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. येत्या 10 मार्चपासून ‘जनशताब्दी’ हिंगोली येथून धावणार आहे. सुधारित वेळेनुसार छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 9.20 ऐवजी 30 मिनिटे उशिराने म्हणजे 9.50 वाजता सुटेल. जालना येथून ‘जनशताब्दी’ निघत असताना 300 जागांचा कोटा शहरासाठी होता. विस्तारामुळे आरक्षणाचा कोटा अर्ध्याने घटून 150 पेक्षा कमी होणार आहे. या विस्तारामुळे आता पूर्वीप्रमाणे वेळेची मागणी अशक्यप्राय झाली आहे.

COMMENTS