Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरण कंपनी खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव – नाना पटोले  

खासगीकरणासाठी अदानी-अंबानींच्या मुलांची आर्थिक सल्लागार मंडळावर वर्णी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात महावितरणच्या कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसल्यानंतर निम्म्ये राज्य अंधारात गेले असून, अदानी समूहाला वीज वितरणचा परवान

धोत्रा येथे सिलबंद शासकीय पोषण आहारात निघाला भलामोठा उंदीर
विचाराचं कृतिशील रसायन
वृक्ष वेद फाउंडेशन व वृक्षमित्र संघटनेच्या वतीने वृक्षारोपण

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात महावितरणच्या कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसल्यानंतर निम्म्ये राज्य अंधारात गेले असून, अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्यास वीज मंडळाच्या कर्मचार्‍यांनी सक्त विरोध केला आहे. असून राज्यातील अनेक जिल्हे काळोखात गेले आहेत. केवळ संपावरच न थांबत कर्मचारी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत.  महावितरणचे खासगीकरण सुलभ व्हावं यासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची राज्याच्या आर्थिक सल्लागार मंडळावर निवड केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
कर्मचार्‍यांचा संप, महावितरणचे खासगीकर आणि अदानी-अंबानी यांच्या मुलांचा संबंध काँग्रेसने जोडला आहे. ’महावितरण ही महत्वाची तसेच फायद्यात असलेली कंपनी अदानीसारख्या खाजगी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस काढला आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. ’महावितरणचे कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांचा संप टाळणे सहज शक्य होते. मागील दोन महिन्यांपासून कर्मचारी संघटना काही मागण्यात करत आहेत, मात्र सरकारने त्याकडे  दुर्लक्ष केले. आता संप सुरू झाला आणि महाराष्ट्र अंधारात बुडाल्यानंतर सरकार चर्चेचे नाटक करत आहे. आधीच चर्चा केली असती तर महाराष्ट्रातील जनतेचे हाल झाले नसते, असे पटोले म्हणाले. ‘शहरी भागातील वीज वितरण ताब्यात घेऊन खासगी कंपनी नफेखोरी करणार तर ग्रामीण भागात सामान्य जनता व शेतकरी यांना मिळणारी सवलतीच्या दरातील वीज मिळणे बंद होणार, महागडी वीज शेतकरी व ग्रामीण जनतेला परवडणारी नाही. पण भाजप सरकारला जनतेचे देणेघेणे नाही. देश विकून देश चालवणारे भाजप सरकार आता महाराष्ट्र विकण्यास निघाले आहे. देशातील सर्वात महत्वाचे असलेले मुंबई विमानतळ व आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीच्या घशात घातला असून आता महावितरणही अदानीच्याच घशात घालण्याचा हा डाव आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे. ’वीज कर्मचार्‍यांचा हा संप पगारवाढ किंवा त्यांच्या फायद्यासाठी नसून सामान्य वीज ग्राहकांना भविष्यात त्रास होऊ नये म्हणून आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS