सातारा / प्रतिनिधी : राज्य शासनाकडून अनुकंपा नियुक्तीबाबतचे सुधारीत सर्वसमावेशक धोरण जाहिर करण्यात आले आहे. या धोरणानुसार मुख्यमंत्री महोदय यांच्या 1
सातारा / प्रतिनिधी : राज्य शासनाकडून अनुकंपा नियुक्तीबाबतचे सुधारीत सर्वसमावेशक धोरण जाहिर करण्यात आले आहे. या धोरणानुसार मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करुन देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण आणि महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा 2023 मधील शिफारस प्राप्त उमेदवारांना लिपीक-टंकलेखक पदाचे नियुक्ती आदेश वितरणाचा कार्यक्रम राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दि. 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वा. स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली. कार्यक्रमास सर्व लोकप्रतिनिधी, कार्यालय प्रमुख व नियुक्ती प्राधिकार्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संबंधितांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

COMMENTS