Homeताज्या बातम्यादेश

नऊ दिवसांत दुसरा मोठा सायबर हल्ला

जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर हँडल हॅक

नवी दिल्ली - आठ दिवसांपूर्वीच दिल्ली एम्सचा सर्व्हर हॅक झाल्यानंतर हॅकर्सनी 200 कोटीं रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्राल

जिल्ह्यातील रुग्णांच्या वेदना मुक्तीसाठी आ.संग्राम जगताप यांचा पुढाकार
धाडगेवाडी शाळेतील स्नेहसंमेलन उत्साहात
कौटुंबिक वादातून एका माथेफिरु इसमाने स्वतःचेच घर पेटवले | LOKNews24

नवी दिल्ली – आठ दिवसांपूर्वीच दिल्ली एम्सचा सर्व्हर हॅक झाल्यानंतर हॅकर्सनी 200 कोटीं रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर हँडल गुरुवारी सकाळी हॅक झाले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सायबर तज्ज्ञ तपासात गुंतले आहेत. गेल्या 9 दिवसांतील हा दुसरा सायबर हल्ला आहे. त्यामुळे हा हल्ला परतवून लावण्याचे मोठे आव्हान सायबर तज्ज्ञांसमोर आहे.
गेल्या आठवड्यात दिल्ली एम्सचा सर्व्हर हॅक झाल्यानंतर सरकारी साइटवर झालेला हा दुसरा मोठा सायबर हल्ला आहे. मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून मंगळवारी सकाळी 5:38 वाजता क्रिप्टो वॉलेट सुई वॉलेटचा प्रचार करणारे ट्विट पोस्ट करण्यात आले. सुई लोगो आणि नाव दर्शविण्यासाठी कव्हर फोटोसह खात्याचा प्रोफाइल फोटो देखील तिरंग्यापासून सुई लोगोमध्ये बदलण्यात आला. ट्विटमध्ये अनेक अनोळखी खाती देखील टॅग करण्यात आली आहेत. मात्र, काही वेळाने अकाऊंट रिस्टोअर करून सर्व ट्विट डिलीट करण्यात आले. सुरक्षा एजन्सी आणि सायबर तज्ञ या घटनेचा तपास करत आहेत. 9 दिवसांपूर्वी 23 नोव्हेंबर रोजी दिल्ली एम्सच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला होता. यादरम्यान, हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीमध्ये 200 कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे, मात्र दिल्ली पोलिसांनी खंडणीचा इन्कार केला आहे. यानंतर खंडणी व सायबर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या, इंडिया कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (उएठढ-खछ), दिल्ली पोलीस आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी या घटनेची चौकशी करत आहेत. हॅकिंगचा स्रोत अद्याप कळू शकलेला नाही. इंडूफेसच्या ताज्या अहवालानुसार, भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रावर दर महिन्याला सुमारे 3 लाख सायबर हल्ले होतात. हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सायबर हल्ले आहेत. अमेरिकन आरोग्य क्षेत्रावर दर महिन्याला सुमारे अर्धा दशलक्ष सायबर हल्ले होतात.

COMMENTS