Sangamner :भीषण अपघात…पुलावरून भरधाव वेगात कंटेनर पलटी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner :भीषण अपघात…पुलावरून भरधाव वेगात कंटेनर पलटी

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावरील संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजार तळानजीक असलेल्या धोकादायक अपघाती वळण रस्त्यावरील अरुंद पुलावरून दोन पलट

कोरोना रुग्णांच्या बिलात बायोवेस्टेजचे शुल्क ; या लुटालुटीला मनपा जबाबदार असल्याचा मनपाचा आरोप
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी सपत्नीक श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
शिवांकुर पतसंस्थेला सहकार समृद्ध पुरस्कार जाहीर

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावरील संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजार तळानजीक असलेल्या धोकादायक अपघाती वळण रस्त्यावरील अरुंद पुलावरून दोन पलट्या खात मालवाहू कंटेनर थेट ओढ्यात उलटून अपघातग्रस्त झाला. या अपघातात चालक मधुकर कांबळे  किरकोळ जखमी झाले. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर ही अपघाताची घटना घडली. अपघातांचा सिलसिला सुरु असलेल्या सदर अरुंद अपघाती पुलावर साक्षात मृत्यू घोंगावत आहे.

 या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच छत्रपती प्रतिष्ठान कार्याध्यक्ष सचिनभाऊ दिघे, सुनील दिघे, बी. सी. दिघे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. नजीकच सुनील दिघे यांचे साईश एजन्सी हे इलेक्ट्रानिक दुकान आहे. सदर दुकानाच्या गोडावूनसमोर लावलेल्या सीसीटीव्हीत अपघाताच्या घटनेचे चित्रिकरण झाले. या अपघातात मालवाहू कंटेनरचे मोठे नुकसान झाले. बाजार तळानजीकच्या अपघाती वळण रस्त्याचे व अपघाती अरुंद पुलाचे त्वरित रुंदीकरण करावे, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे व बी. सी. दिघे यांनी केली आहे.

COMMENTS