Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सलमान खानचा ‘गजनी’ लूक व्हायरल

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यानंतर आता तो त्याच्

9 वर्षांच्या कॅन्सर पीडित मुलाची सलमान खाननं घेतली भेट
सलमान खानची हत्या पनवेलच्या फार्म हाऊसवर करण्याचा कट
‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून शहनाझ गिल बाहेर

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यानंतर आता तो त्याच्या नव्या प्रोजेक्ट्सच्या तयारीत लागला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान एका रिअलिटी शोमध्ये सुत्रसंचालक म्हणून दिसला. त्यानंतर आता सलमान त्याच्या काही आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. तर आता नुकताच सलमान एका डिनर पार्टीत दिसला. यावेळी त्याची बाल्ड लूक पाहून अनेकांना आश्चर्य झाले. नक्की असं काय झालं की सलमाननं बाल्ड लूक केला. असा सवाल त्याच्या लाखो चाहत्यांना पडला आहे. तर त्याचं कारण आता समोर आलं आहे.सलमान काल रात्री वांद्रे परिसरात एका पार्टीत दिसला होता. यावेळी सलमाननं काळ्या रंगाचं शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. तर यावेळी सलमानच्या कपड्यांनी नाही तर त्याच्या हेअरकटनं लक्ष वेधलं आहे.

सलमान खानचे वेगवेगळे लूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. तो ज्यापण चित्रपटात काम करतो त्यातील त्याचा गेटअप हा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आणि त्यातही त्याचा लूक हे त्याचे चाहते फॉलो करताना दिसतात. सलमानच्या या लूकला मिलिस्ट्री कट देखील बोलू शकत नाही. कारण त्यात केसांची थोडी जास्त लांबी असते. पण सलमान खाननं केस खूपच लहाण केले असून त्याचा हा लूक वेगळाच दिसतोय.सलमानच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत अनेक प्रश्न कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करत ‘तेरे नाम’ चा लूक घेतला आहे, असं म्हटलं. तर एका नेटकरी म्हणाला की ‘तेरे नाम 2’ साठी सलमान तयारी करत आहे की आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमानशिवाय या लूकमध्ये दुसरं कोणी चांगलं दिसत नाही. तिसरा नेटकरी म्हणाला, याला अभिनेता म्हणतात, ‘जो वेगवेगळ्या भूमिका साकरण्यासाठी त्याचे केस कापतो. आणखी एक नेटकरी उत्साही होत म्हणाला, ‘तेरे नाम 2 ची स्क्रिप्ट रेडी आहे वाटतं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘किती चांगला आहे सलमान, पठाणचं प्रमोशन जितकं शाहरुख करत नाही तितकं सलमान करतोय.’ दुसरीकडे काही नेटकऱ्यांना सलमानचा हा लूक पसंतीस उतरलेला नाही. एका नेटकऱ्यानं कमेंटकरत म्हटले की ‘हा काय लूक आहे. 80 वयाचा दिसतोय दुसरा नेटकरी म्हणाला, ‘भाईजान हे काय केलयं.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हा तर म्हातारा झाला. आणखी एक नेटकरी म्हणाला की ‘त्याचे केस उडायला लागले वाटतं (सलमानचं टक्कल पडतयं)’ दरम्यान, बॉलिवूड हंगामाला एका सोर्सनं दिलेल्या माहितीनुसरा सलमानचा हा लूक त्याच्या आगामी चित्रपटासाठी आहे. या आगामी चित्रपटात सलमान हा एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दिग्दर्शन विष्यु वर्धन आणि करण जोहर यांचा असणार आहे. या चित्रपटाचं अजून नाव ठरलेलं नाही.

COMMENTS