Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाभिमानीमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव

स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप

पुणे/प्रतिनिधी ः शेतकर्‍यांसाठी काम करणारी संघटना अशी ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मागच्या काही दिवसांपासून कुरबूर पाहायला मिळत असून, स

श्री साईबाबांच्या चरणी नऊ दिवसांत 18 कोटींची देगणी
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकिय शिक्षणाचे भवितव्य अधांतरी
पारनेर शिवसेनेशी जवळीक ; खा. डॉ. विखेंना भोवणार? ; भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार दाखल

पुणे/प्रतिनिधी ः शेतकर्‍यांसाठी काम करणारी संघटना अशी ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मागच्या काही दिवसांपासून कुरबूर पाहायला मिळत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मागच्या काही दिवसांपासून नाराज असून, ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यावर स्वाभिमानी संघटनेमध्ये भाजपकडून फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असलचा गंभीर आरोप स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.  
पक्ष आणि संघटना फोडण्याचे भाजपचे अधिकृत काम आहे. मागच्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यात ते दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जे घडतंय यामागे सुद्धा भाजप असल्याचा संशय राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. भाजपकडून ऑफर दिली जाते, निश्‍चितच संशयाला जागा आहे. याआधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि याआधीही शेतकरी संघटनेत जे झाले आहे. त्यामुळे आताही जे घडतंय. त्यामागे भाजप असण्याची शक्यता राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. संघटना म्हटले की कुरबुरी होत असतात. त्यासाठी आम्ही एक व्यवस्था निर्माण केली आहे, असे ते म्हणाले. एखाद्या कार्यकर्त्याला जर काही अडचण असेल. तर त्याला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी शिस्तपालन समिती तयार केली आहे. त्या समितीसमोर रविकांत यांनी आपले म्हणणं मांडायला हवे होते. पण त्यांनी तसे केले नाही. ते फक्त माध्यमातच बोलत आहेत. पण त्यांची तक्रार आलेली नसतानाही. बातम्यांतील त्यांचा सूर लक्षात घेता. ही बैठक बोलवण्याची सूचना मी शिस्तपालन समितीला केली. मंगळवारी तशी बैठक होत आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. तर रविकांत तुपकर यांनीही या सगळ्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मी या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार या केवळ अफवा आहेत. मला संघटनेत राहूनच काम करायचे आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न मांडायचे आहेत. शेतकर्‍यांसाठी लढायचे आहे. माझ्यासाठी शेतकरी हा माझा आत्मा आहे. शेतकरी हा माझा प्राण आहे. त्यामुळे मी त्यांच्याचसाठी काम करत राहणार, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.

शेतकरी चळवळीचे काम करणार ः रविकांत तुपकर – राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये फूट पडणार असून रविकांत तुपकर हे दुसरा गट स्थापन करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहेत. अशामध्ये रविकांत तुपकर यांनी बुलडाण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ’मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच काम करणार असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रविकांत तुपकर यांनी सांगितले की, ’त्या बैठकीला जाण्याचे कारणच नाही. वेळोवेळी मी राजू शेट्टी यांना माझे म्हणणे मांडले आहे. त्यावर अजूनपर्यंत कुठलीही भूमिका घेतली नाही. आणि मी या बैठकीला येणार नाही हे त्यांना मी सांगितले होते. त्यामुळे मी पुढे आता शेतकर्‍यासाठी काम करत राहणार असल्याचे तुपकर यावेळभ म्हणाले. 

COMMENTS