Homeताज्या बातम्यामनोरंजन

सलमान खानने अंकिता लोखंडे समोर विक्की जैनचे सत्य उघड केले

मुंबई प्रतिनिधी - बिग बॉस 17 या रिअलिटी शो सध्या चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक आता घरात रमले आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. त्यातच सर्वात जा

अल्पवयीन मुलाला मिळाली होती सलमानच्या हत्येची सुपारी
सलमानची अजब स्टाईल!
सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या आरोपीची आत्महत्या

मुंबई प्रतिनिधी – बिग बॉस 17 या रिअलिटी शो सध्या चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक आता घरात रमले आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. त्यातच सर्वात जास्त फॅन फॉलोविंग असलेली स्पर्धक म्हणेज अंकिता लोखंडे हिची जास्तच चर्चा आहे. अंकिताने या घरात तिचा पती विकी जैनसोबत एंट्री केली. या दोघांच्या चाहत्यांना वाटलं होत की हे घरात पावर कपल म्हणुन राहतील मात्र तसं काहीही झालेलं नाही. पहिल्या दिवसापासून अंकिता आणि विकी घरात एकमेकांसोबत भांडत आहे. अंकिताने तिला घरात एकटं सोडल्याचा आरोप विकीवर केला तर विकीनंही अंकितावर अनेक आरोप केले. आता पुन्हा अंकिता आणि विकीमध्ये खटके उडाले आहेत. त्यातच आता विकेंड का वार मध्ये सलमान खान देखील विकीचा क्लास घेताना दिसणार आहे. निर्मात्यांनी या विकेंड का वार ची एक झलक सोशल मिडियावर शेयर केली आहे ज्यात सलमान विकीचं पितळ उघड करतो तर है ऐकल्यानंतर अंकिता रडायला लागते. बिग बॉस 17 च्या आगामी ‘वीकेंड का वार’चा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सलमान घरातील सदस्यांसोबत बोलताना दिसत आहे. यात सलमान विकीचा पर्दाफाश करतो. सलमान खान अंकिताला म्हणतो की, ‘तू नेहमीच टेलिव्हिजनवर लीड आहेस, मग आता अचानक तू इशा आणि विकीच्या भाऊ-बहिणीच्या नाटकात मित्राची भूमिका कशी काय करतेस? तुझ व्यक्तिमत्व हरवायला तू इथे आली आहेस का? तू तुझ्या पती विकीसोबत यायचं ठरवलं आणि तुझा नवरा खानजादीला तुझ्याशी भांडायला सांगतो.’ यानंतर सलमान विकीला म्हणतो, प्रेम दिलं, पैसा दिला… हे सगळे म्हणत आहेत, प्रेम तूच दिले आहेस का विकी?’. हे ऐकून विकी घाबरतो आणि म्हणतो मी मस्करी करत होतो. यावर सलमान म्हणतो, ‘तो विनोद नव्हता.जेव्हा अंकिताचा नवरा विकीचे गुपित उघड होत तेव्हा ती भावूक होते आणि तिच्या डोळ्यात येतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी दोघांना ट्रोल करत आहे तर अनेकांनी विकीला पाठिंबा दिला आहे. मागच्या आठवड्यातील विकेंड का वार मध्ये सलमानने इशाला खुप झापलं होतं. आता त्याने विकीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

COMMENTS