Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मासिक पाळीच्या रक्ताची जादूटोण्यासाठी विक्री

आरोपीवर तात्काळ कारवाई करावी ः रुपाली चाकणकर

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात अंधश्रद्धा निमूर्लन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु असली तरी, अंधश्रद्धेचे अनेक प्रकार समोर येतांना दिसून येत आहे

तिसरी फेरी निर्णायक !
रॅपर कोस्टा टिचचं २७ व्या वर्षी निधन
पुढील सात दिवस फारसा पाऊस नाही; पुणे वेधशाळेचा अंदाज

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात अंधश्रद्धा निमूर्लन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु असली तरी, अंधश्रद्धेचे अनेक प्रकार समोर येतांना दिसून येत आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहणार्‍या कुटुंबातील सुनेवर बळजबरी करुन मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी 50 हजाराला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सदरचा प्रकार अतिशय घृणास्पद असून विकृत मानसिकता असणार्‍या या आरोपींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. याप्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोग या केसच्या संबंधितांना निर्देश देईलच परंतु पुण्यासारख्या शहरात अजूनही अंधश्रध्देला बळी पडणारी कुटुंबे आहे ही दुर्देवी बाब आहे. दोनच दिवसांपूर्वी जागतिक महिला दिन साजरा करत आपण सर्वांनीच स्त्री शक्तीचा सन्मान केला. परंतु आज घृणास्पद घटनेत महिलेवर झालेला अत्याचार पाहून अजून किती आणि कसा लढा बाकी आहे असा प्रश्‍न पडतो. पुणे हे विद्येचे माहेरघर असून अंधश्रध्देला खतपाणी घालणार्‍या घटना चुकीच्या आहे. अशाप्रकारच्या घटना पाहता महिलांबाबत अत्याचाराच्या घटना कितपत रुजलेल्या दिसून येते. असे प्रकार रोखण्यासाठी राज्य महिला आयोग जागरुकता कार्यक्रम सातत्याने राबवत आहे. कौटुंबिक वादातून 27 वर्षीय पत्नी सोबत अघोरी कृत्य करुन तसेच तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह सात जणांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीसांनी आरोपींच्या विरुध्द अनैसर्गिक कृत्य, विनयभंग व शारिरिक व मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंध अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. विवाहनंतर पिडित महिला बीड जिल्हयातील एका गावात पतीच्या घरी राहत होती. त्यावेळी मासिक पाळी दरम्यान कापसाने तिचे रक्त काढून जादुटोणा करिता त्याची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

COMMENTS