नाशिक- रजोनिवृत्ती म्हणजे नेमके काय? व त्यामूळे शारीरीक व मानसिक आरोग्यावर होणारे परीणाम.. हाडांचा ठिसूळपणा टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी.. यास
नाशिक- रजोनिवृत्ती म्हणजे नेमके काय? व त्यामूळे शारीरीक व मानसिक आरोग्यावर होणारे परीणाम.. हाडांचा ठिसूळपणा टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी.. यासह कर्करोगाचे संभाव्य धोके व निदानासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या.. अशी उपयुक्त माहिती महिला वर्गाने जाणून घेतली. औचित्य होते लोकज्योती महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘श्रावण सखी’ या उपक्रमाचे. आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतांनाच सहभागी सखींनी सुदृढ जीवन जगण्यासाठीचा मुलमंत्र जाणून घेतला.
डीजीपीनगर-१ येथील श्री निरायम ज्येष्ठ नागरिक भवन येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सखींच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे सखींना त्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी नारायणी हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मयुरी केळकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. दीपा जोशी तसेच आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ डॉ. मोनाली राणे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ.मयुरी केळकर यांनी महिलांमध्ये उद्भवणार्या आरोग्यविषयक समस्या, त्यावर उपाययोजना, आरोग्याची कशा प्रकारे काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. तर डॉ.दीपा जोशी यांनी माता-शिशू यांचे चांगले आरोग्य राहाण्यासाठी उपयुक्त टिप्स दिल्या. स्तनपान हे शिशूसाठी अमृताप्रमाणे असते असे सांगतांना बाळाच्या संपूर्ण वाढीबाबतची माहिती त्यांनी दिली.
डॉ.मोनाली राणे यांनी आयुर्वेदातून संतुलित जीवन जगण्यासाठीचा मार्ग सांगितला. पारंपारीक आरोग्य चिकित्सा पद्धतीचा आधार घेत महिलांनी सुदृढ जीवन जगण्याचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लोकज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा उल्का कुरणे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यापुढेदेखील सदस्य महिलांसाठी विविध उपयुक्त कार्यक्रम राबविण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर कार्यक्रमात सहभागाबाबत संस्थेच्या सचिव वैशाली पिंगळे यांनी उपस्थित सखींचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष कुमुदिनी कुलकर्णी, कमला पणेर, सविता चतूर, शिला राजपूत यांच्यासह जया खोडे, जयश्री राणे, अनिता जस्ते, कुमुदिनी पाटील, मंजुषा पहाडे, शारदा भंडारी, शशिकला पाटील, वसुंधरा तिडके यांनी अथक परीश्रम घेतले
COMMENTS