Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सद्गगुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ःजगातील एकमेव असलेल्या कोपरगाव येथील बेट भागातील दैत्यगुरू श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये सद्गुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व

BREAKING: तहसीलदार अर्चना पागिरे यांचा अपघात की हत्येचा प्रयत्न…???? पहा Lok News24
अरे बापरे…मनपा अधिकार्‍यांनी विकला मनपाचाच भूख़ंड? ; सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा दावा, आयुक्तांकडून चौकशीची ग्वाही
शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत शासन शेतकऱ्यांच्या बाजूने : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

कोपरगाव प्रतिनिधी ःजगातील एकमेव असलेल्या कोपरगाव येथील बेट भागातील दैत्यगुरू श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये सद्गुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज, विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रमाचे प.पू. जंगलीदास गुरुमाऊली, प.पू. शारदागिरी महाराज, प.पू.उंडे महाराज व अन्य संत, महंतांसह असंख्य भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी सहभागी होऊन सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराजांचे व पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोपरगाव शहराजवळील बेट भागात दैत्यांचे गुरू व संजीवनी मंत्राचे निर्माते श्री शुक्राचार्य महाराज यांचे मंदिर आहे. हे जगातील एकमेव मंदिर असून, प्रति त्र्यंबकेश्‍वर म्हणून या देवस्थानची ख्याती आहे. या परिसराला मोठा धार्मिक वारसा लाभलेला आहे. सदगुरू शुक्राचार्य मंदिरात कोणतेही शुभ कार्य किंवा विवाह करण्यास कोणताही मुहूर्त, वेळ व नक्षत्र लागत नाही. बाराही महिने या मंदिरात शुभकार्य व विवाह सोहळे संपन्न होतात. त्यामुळे येथे भाविकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन श्री शुक्राचार्य महाराजांचे व पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच त्यांनी संत, महंतांचे मनोभावे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सद्गुुरू शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव, शिव-पार्वती विवाह सोहळा व पालखी मिरवणुकीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.याप्रसंगी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, दादासाहेब नाईकवाडे, विजय रोहम, विलासराव आव्हाड, अप्पासाहेब शिंदे, भागचंद रुईकर, मंदिरप्रमुख सचिन परदेशी, कालू अप्पा आव्हाड, बाळासाहेब लकारे, विशाल आव्हाड, महेंद्र नाईकवाडे, दत्तात्रय सावंत, भीमा संवत्सरकर, प्रसाद पर्‍हे, बाळासाहेब गाडे,सचिन सावंत, मुन्ना आव्हाड, मधुकर साखरे, विभुते नाना, पटवर्धन आदींसह सद्गुरू शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

COMMENTS