Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज्यकर्त्यांना सर्वसामान्यांचा प्रश्‍नांचा विसर

राज्यात सध्या मान्सूनचा पाऊस नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जून महिन्याचा मध्यावधी उलटला असला तरी, राज्यात पाऊस नाही, त्यामुळे पेरण्या कश

शरद पवारांची संदिग्ध भूमिका
सुटकेची आशा
कर्जबुडवे आणि हिंडेनबर्ग अहवाल

राज्यात सध्या मान्सूनचा पाऊस नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जून महिन्याचा मध्यावधी उलटला असला तरी, राज्यात पाऊस नाही, त्यामुळे पेरण्या कशा करायच्या हा शेतकर्‍यांसमोर प्रश्‍न असतांना, राज्यकर्ते मात्र आपल्याच राजकारणात मुश्गुल असल्याचे दिसून येत आहे. नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ठाकरे गट आणि शिंदे गटांनी दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेत ऐकमेकांवर येथच्छ टीका-टिप्पणी केली. आम्हीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगण्यात येत आहे. खरंतर याचा फैसला कोणत्याही सभामध्ये होणार नसून, तो फैसला जनतेच्या दरबारातच होईल यात शंका नाही. आगामी लोकसभा निवडणुकीला उणेपुरे एक वर्षांचा कालावधी उरला आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाची लाट आहे, कोणत्या पक्षाला जनाधार आहे, याचा निवाडा जनतेच्या दरबारात होईलच, मात्र  त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेतील, त्यामुळे आगामी काळ हा ठाकरे गटासाठी कठीण काळ असणार आहे. मात्र जनतेच्या दरबारातील निवाडा हा शेवटचा निवाडा असेल. जनता शिंदे गटाला स्वीकारते की, ठाकरे गटाला स्वीकारते, ते निवडणुकीतून स्पष्ट होईल, तेव्हाच या संपूर्ण प्रकरणाचा निकाल होईल. राज्यात कोणत्याही निवडणुका नसल्यामुळे राजकीय वातावरण शांत असायला हवे होते, मात्र महाराष्ट्र राज्य त्याला अपवाद आहे. महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घडामोडी घडतांना दिसून येत आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसमोर आपले अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. आणि ते आव्हान कोणता पक्ष कसे पेलतो, त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. पुन्हा एकदा एका नव्या संस्थेने आपला अहवाल जाहीर केला असून, त्यात सर्वाधिक मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पसंदी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे आजमितीस निवडणुका झाल्यास भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज देखील या संस्थेने नोंदवला आहे. राज्यात मतांचे धुव्रीकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे. महाविकास आघाडी जरी एकत्र लढली तरी, राज्यात नवा पक्षाचे आगमन झालेले आहे. भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अध्यक्ष असून, त्यांनी महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या सभा जंगी होतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर बीआरएसमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसमधील आणि काँगे्रसमधील नेते प्रवेश करतांना दिसून येत आहे. त्यामुळे बीआरएस पक्षाचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. शेतकरी प्रश्‍न हाच बीआरएसचा प्रमुख अजेंडा असल्यामुळे आणि महाराष्ट्रात जर बर्‍यापैकी जागा मिळाल्या तर, बीआरएस राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पावू शकतो. बीआरएस जर राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आल्यास, चंद्रशेखर राव यांचे राष्ट्रीय स्तरावरील महत्व वाढेल, यात शंका नाही. मात्र महाराष्ट्रात आगामी निवडणुकांमध्ये मतांचे धुव्रीकरण मोठ्या प्रमाणावर बघायला मिळू शकते. मात्र या संपूर्ण राजकारणात शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांचे प्रश्‍न बाजूला पडतांना दिसून येत आहे. बेरोजगारी, महागाई वाढत चालली आहे. गव्हाचे दर वाढत चालले आहे, त्याचबरोबर धान्यांचे दर देखील वाढत चालले आहे. यंदा अल निनोचा प्रभावामुळे पाऊसाचे प्रमाण कमी असणार आहे, अशा परिस्थितीत अन्नधान्यांची परिस्थती गंभीर निर्माण होवू शकते, त्यामुळे राज्य सरकारे असो वा केंद्र सरकारने काही बाबाींचा गांभीर्याने विचार करण्याची खरी गरज आहे. 

COMMENTS