Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा

राजकीय संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भाग घेतल्याने वातावरण चिघळले

देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः  देवळाली प्रवरा येथिल एका वरीष्ठ महाविद्यालयातील विद्याथ्यार्च्या दोन गटात धुमचक्री उडाली. यात एका गटाच्या  विद्यार्थ्य

लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी नवरीचा दागिने घेऊन पोबारा
पारनेरच्या तहसीलदारांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अनाथ गायींची शाळा वीरगावची गोधाम गोशाळा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधीः  देवळाली प्रवरा येथिल एका वरीष्ठ महाविद्यालयातील विद्याथ्यार्च्या दोन गटात धुमचक्री उडाली. यात एका गटाच्या  विद्यार्थ्यावर ब्लेडने वार केले असुन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु झालेली धुमचक्री सोसायटी डेपो चौकात दोन्ही बाजुने 400 ते 500 चा जनसमुदाय एकमेकांवर चालुन येत होता. पोलीस वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळलो.हि धुमचक्री नाजुक कारणातुन घडल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.माञ या प्रकरणात दोन्ही गटाच्या बाजुने राजकीय हस्तक्षेप झाल्याने सायंकाळ पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
             याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथिल कडू कदम वस्ती रोडलगत अहमदनगर येथिल नामवंत संस्थेचे  महाविद्यालयात आहे. याच महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या दोन विद्यार्थ्यामध्ये नाजुक कारणातुन वाद झाले. वाद विकोपाला जावुन दोन्ही गटाकडुन 400 ते 500 विद्यार्थी एकमेकांवर धावून जात होते. या विद्यार्थ्याच्या भांडणात येथिल सावकार व अवैध व्यावसायिक यांनी भाग घेतला.हे सर्वजण हातात काठ्या, दांडे,गज घेवून धावत आल्याने सोसायटी चौकातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद करुन घेतली. दिवसभर दुकाने बंदच ठेवण्यात आली.दोन्ही गटांची आक्रमकता पाहता.दंगली सारखी परीस्थिती निर्माण झाली होती. याबाबतची माहिती राहुरी पोलीसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक मेघःशाम डांगे,पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा, पो.हे.काँ.प्रभाकर शिरसाठ, श्रीरामपूर येथिल रिर्झव्ह पोलीस फोर्स घटनास्थळी दाखल झाले.पोलीस दाखल होताच दोन्ही गटाच्या मोहरक्यांची धरपकड करण्यास सुरवात केली.9 ते 10 जणांना पोलीसांनी ताब्यात घेवुन सरकारी वाहनाद्वारे राहुरी पोलीस ठाण्यात नेऊन बसवुन ठेवण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटाकडुन राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करुन पोलीस ठाण्यात ठाण मांडुन बसले होते.त्यामुळे सायंकाळ पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.दोन गटातील धुमचक्री कोणाच्या तरी जीवावर बेतली असती.या घटने नंतर देवळाली प्रवरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विद्यार्थीनीच्या आईची आत्महत्येची धमकी!
             या महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणारी मुलगी परीक्षा देण्यास महाविद्यालयात जाते म्हणुन घरुन महाविद्यालयात आली. टाकळीमिया रोडलगत राहणार्‍या याच महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या तरुणाबरोबर सैराट झाली. याची कुणकूण त्या विद्यार्थींनीच्या घरी लागताच तीच्या आईने महाविद्यालयातील शिक्षकांनी माझी मुलगी आणुन द्यावी. अन्यथा महाविद्यालयासमोर आत्महत्या करीन. असा इशारा देताच धुमचक्रीतील काही विद्यार्थ्यांचा शोध घेत पोलीस महाविद्यालयात पोहचले. पोलीसांनी सैराट झालेल्या दोघांचे मोबाईल नंबर घेवुन संपर्क केला असता.या विद्यार्थीनीने मी स्वतः पळून आले आहे.आम्ही दोघांनीहि विवाह केला आहे. सायंकाळपर्यंत घरी पोहचतो असे सांगितल्याने शिक्षकांचा जीव भांड्यात पडला. विद्यार्थीनीच्या आईने माञ मुलीच्या सैराट होण्यामागे शिक्षक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
चौकटः   तीन महिन्यापुर्वी याच महाविद्यालयात टाकळीमिया परिसरातील विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या प्रांगणात एका शिक्षकास श्रीमुखात मारुन बेदम मारहाण केल्याच्या घटनेवर येथील प्राचार्याने पडदा टाकल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची हिम्मत वाढत गेल्याने विद्यार्थ्यांच्या दोन गटात धुमचक्री होवुन दंगल सद्रुष्य परिस्थिती निर्माण झाली होती.

COMMENTS