Homeताज्या बातम्यामनोरंजन

रिया चक्रवर्तीचं ३ वर्षांनी कमबॅक

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर गेली अनेक वर्षे चर्चेत राहिलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला य

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा
क्रांतिवाद्यांनी प्रतिक्रांती रोखायला हवी – डॉ.सागर जाधव
महापालिकेच्या हेल्पलाईवर नो रिस्पॉन्स ; कोरोना उपचार सुविधेची नागरिकांना मिळेना माहिती

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर गेली अनेक वर्षे चर्चेत राहिलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशांतच्या प्रकरणामुळे रिया छोट्या पडद्यापासून अनेक वर्षे दूर होती. पण आता तब्बल तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्ती लवकरच आपल्या करिअरमध्ये कमबँक करणार आहे. एमटीव्हीवरील प्रसिद्ध रियालिटी शो ‘रोडीज 19’ च्या माध्यमातून रिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकीकडे रियाच्या कमबॅकमुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपुतचे चाहते संतप्त झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर रियाच्या रोडिजमधील एन्ट्रीवर संताप व्यक्त केला आहे.

COMMENTS