Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाबळेश्‍वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा

सातारा / प्रतिनिधी : महाबळेश्‍वर येथील पर्यटन विषयक विविध विकास कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचविलेली होती. या विकास काम

यवतमाळ जिल्ह्यातील 104 वर्षीय आजोबांची नायगावला भेट
राष्ट्रवादी विरोधात सर्वाना बरोबर घेऊन आगामी निवडणूका लढविणार : निशिकांत पाटील
मनसे कार्यकर्ता खूनप्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक

सातारा / प्रतिनिधी : महाबळेश्‍वर येथील पर्यटन विषयक विविध विकास कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचविलेली होती. या विकास कामांचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्‍वर येथील वन विभागाच्या हिरडा या विश्रामगृहात घेतला.
या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्‍वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना. देसाई यांनी महाबळेश्‍वर शहरातील पार्कीग व्यवस्था, पर्यटन स्थळांचा विकास, अंतर्गत रस्ते तसेच महाबळेश्‍वर परिसरालगतची पर्यटन स्थळे विकसीत करण्याबाबत कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. ही कामे मुख्यमंत्री शिंदे यांनी सूचविलेली आहेत. ही कामे जलदगतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

COMMENTS