Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोपीचा पोलिस कोठडीत आत्मसन्मान भंग होऊ देऊ नका

पोलिस महासंचालकांचे सगळ्या पोलीस ठाण्यांना आदेश

मुंबई : आरोपी पोलिस कोठडीत असताना त्याचा आत्मसन्मान व गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आणि आरोपींना विवस्त्र न ठेवण्याचे आदेश राज्या

अभिनेता गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
अशक्य ते शक्य करून दाखविण्याची हीच वेळ; या आव्हानाचा सर्वजण मुकाबला करू – छगन भुजबळ
रिसेप्शनची तयारी करण्यासाठी नवरी-नवरदेव खोलीत गेले अन्…

मुंबई : आरोपी पोलिस कोठडीत असताना त्याचा आत्मसन्मान व गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आणि आरोपींना विवस्त्र न ठेवण्याचे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सगळ्या पोलिस ठाण्यांना दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस महासंचालकांनी हे आदेश काढले आहेत.
पोलिस महासंचालकांचे याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने त्याची दखल घेतली. कोठडीत आरोपीचे कपडे काढणे अयोग्य आहे, असे नमूद करून अशा प्रकारांना रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार हे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिस महासंचालकांना दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर उपरोक्त परिपत्रक काढण्यात आले आहे. ताडदेवस्थित नितीन संपत यांच्या पत्नीने केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी पोलीस कोठडीत आरोपींचा आत्मसन्मान जपण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. विनयभंगाच्या आरोपाखाली संपत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना सातरस्ता येथील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी, त्यांचे कपडे काढले, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. तसेच, पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि संपत यांना बेकायदा ताब्यात घेतल्याप्रकरणी नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

COMMENTS