Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू वाहतूकीवर कारवाई : दोघे ताब्यात

कराड / मलकापूर : चचेगांव (ता. कराड) या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कार्यवाहीत देशी मद्याच्या एकूण 240 सिलबंद बाटल्या तसेच बिअर 500 मिली क्षमते

जावळी तालुक्यात रब्बीच्या पेरणीस बैलजोडीला ट्रॅक्टरचा पर्याय
औदुंबर-भुवनेश्‍वरीदरम्यान होणार झुलता पूल; झुलत्या पुलामुळे पर्यटनाला चालना
ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमिवर सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज; जिल्हा रुग्णालयात 100 बेडसह दोन आसीयू राखीव : डॉ. सुभाष चव्हाण

कराड / मलकापूर : चचेगांव (ता. कराड) या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कार्यवाहीत देशी मद्याच्या एकूण 240 सिलबंद बाटल्या तसेच बिअर 500 मिली क्षमतेच्या एकूण 144 सिलबंद कॅन मिळून आले. या कारवाईत 2 चारचाकी वाहनांसह 1 लाख 95 हजार 960 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित हे साकुर्डी व मलकापूर येथील आहेत.
उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, कारवाईत संशयित आरोपी दिपक बबलू कांबळे (रा. साकुर्डी ता. कराड जि. सातारा), मुस्तफा मोहिद्दीन मणियार (रा. लक्ष्मीनगर मलकापुर ता. कराड जि. सातारा) असे दोन इसम मिळून आले. मिळून आलेल्या इसमांकडून 2 चारचाकी वाहनासह अंदाजे 1,95,960/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासकामी संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचे आदेशानूसार तसेच अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार, दि. 31 रोजी नववर्षे आगमन या पार्श्‍वभूमीवर अवैद्य मद्याची वाहतूक होणार असल्याच्या शक्यतेने गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक एस. एस. साळवे, एस. बी. जंगम, सहा दु. नि. एन. के. जाधव व जवान व्ही. व्ही. बनसोडे, बी. एस. माळी, एस. बी. जाधव यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक एस. एस. साळवे करत आहेत.

COMMENTS