Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ भातासह सोयाबिनच्या पिकांचे मोठे नुकसान

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून यामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटण तालुक

निर्बंध घालून महाबळेश्‍वरसह पाचगणी परिसर पर्यटकांसाठी खुला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती; राज्य निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
शिक्षणरत्न पुरस्काराने दीपक भुजबळ सन्मानीत

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून यामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्यात सर्वत्र गेले काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जोर धरला आहे. परतीच्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीस आलेले भात पीक अक्षरशः जमिनीवर लोळत आहे. सोयाबीन कुजण्याच्या अवस्थेत आहे,. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पाटण तालुक्यातील केरा, कोयना, मोरणा विभागात भात पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तरव्यांपासून लागणीपर्यंत जंगली जनावरांकडून पिकांचे फारच नुकसान होते. मात्र, जंगली जनावरांकडून वाचवलेले पिक परतीच्या पावसामुळे वाया जातेय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या भात पीक सोयाबीन पिक काढणीस आले आहे. परंतू परतीच्या मान्सून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भात पिक जमिनीवर लोळत असून त्याखाली शेतात पाण्याची डबकी साठली आहेत. त्यामुळे चार महिन्यात घाम गाळून कष्टाने फुलवून आणलेली शेती वाया जाऊ लागलेली आहे. सोयाबीन काढणीला आले आहे. परंतू पावसाने शेतात डबकी साठली असल्याने ते कुजून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, नाचणीच्या पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे. येत्या काही दिवसांत पाऊस कायम राहिल्यास ओला दुष्काळ सदृश्य परस्थीती निर्माण होऊ शकते. यामुळेच शेतकरी चिंतातुर झाला आहे.

COMMENTS