Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा

रेणापूर प्रतिनिधी - गेल्या 27 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल होऊन शेतकरीचिंतातूर झाला आहे तेव्हा रेणापूर तालुका द

पंजाबमध्ये गॅस गळतीमुळे अनेकांचा मृत्यू 
 नराधम बापानेच केला मुलीवर बलात्कार
*लोकन्यूज 24च्या बातमीने प्रशासनाला आली जाग l पहा LokNews24*

रेणापूर प्रतिनिधी – गेल्या 27 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल होऊन शेतकरीचिंतातूर झाला आहे तेव्हा रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा, अशी मागणी रेणापूर शहर काँग्रेसच्या वतीने तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदनही लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्याकडेही देण्यात आले आहे .
रेणाफर तालुक्यात गेल्या 27 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीनसह अन्य पिके कोमेजली असून माना टाकत असल्याने शेतक-यांतचिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्याचीहीचिंता दिवसेंदिवस वाढत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे . तेव्हा यावर गांभीर्याने विचार करून रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवावा व तालुक्यातील शेतक-यांना त्वरीत 25 टक्के पिकविमा मंजुर करावा आणि शेतक-यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळण्यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य ती पाऊले उचलून तालुक्यातील शेतक-यांची दखल घेत विमा कंपन्यांना विमा मंजूर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात व योग्य त्या उपायोजना करण्यात याव्यात, असे ही तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीन अली सय्यद , कृउबाचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अ‍ॅड शेषेराव हाके, संचालक प्रविण माने, अमर वाकडे, बाळकृष्ण खटाळ, जनार्धन माने, अ‍ॅड एम पी पडोळे, राजाभाऊ साळुंके, गणेश सौदागर, अजय चक्रे, रहिम पठाण, सचिन इगे, श्रीधर बडे, अतुल गोकुळे, बाळासाहेब करमुडे, भूषण पनुरे, सुरज वंगाटे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत.

COMMENTS