Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून क्लीनचीट

मुंबई प्रतिनिधी - सीबीआयकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पटेल यांना सीबीआयकडून क्लीन चिट देण्य

Yeola: तुळजाभवानी मंदिरात 808 सप्तशती पाठाचे वाचन (Video)
अवकाळी पावसाने झालेल्या शेतपीक नुकसानीचा अंतिम अहवाल आठवडा भरात सादर करावा: मंत्री अनिल पाटील
विजय देवरकोंडा करणार अवयव दान

मुंबई प्रतिनिधी – सीबीआयकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पटेल यांना सीबीआयकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने आता क्लोजर रिपोर्ट दाखल करत पटेल यांच्यावर कारवाईची टांगलेली तलवार दूर केली आहे. भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर वर्षभराच्या आतच हा क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्याने आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल यांच्याशी संबंधित प्रकरण हे सीबीआयडे प्रलंबित होते. मागील सात ते आठ वर्षांपासून सीबीआयकडून याबाबत तपास केला जात होता. मागील सात वर्षांपासून कोणताही दिलासा पटेलांना मिळाला नव्हता. पण आता त्यांना सीबीआयने क्लीन चिट दिली आहे. सीबीआयने याबाबत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. कोणताही पुरावा प्रफुल पटेल यांच्याविरोधात सापडले नसल्याचे सीबीआयने क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. 2017 मध्ये पटेलांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. मंत्रिपदावर असताना प्रफुल पटेल यांनी भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा हा कथित आरोप होता. तेव्हापासून सीबीआयची चौकशी आणि या प्रकरणी तपास सुरू होता. मात्र आता हा मोठा दिलासा पटेल यांना मिळाला आहे.

COMMENTS