Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

29 ऑक्टोबर रोजी वधू-वर मेळाव्यास नाव नोंदणी करून उपस्थित रहा-तानाजी बाप्पू जंजिरे

कडा प्रतिनिधी - मराठा सेवा संघाच्यावतीने 29 ऑक्टोबर रोजी परमेश्‍वर मंगल कार्यालय कडा येथे मोफत राज्यस्तरीय मराठा वधू - वर परिचय मेळावा आयोजित के

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने दिल्या ५ कोटी लस मात्रा
राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या मुलीला आला हृदयविकाराचा झटका
पेशवाईच्या पराभवाचा जश्न : भीमा-कोरेगाव स्तंभ!

कडा प्रतिनिधी – मराठा सेवा संघाच्यावतीने 29 ऑक्टोबर रोजी परमेश्‍वर मंगल कार्यालय कडा येथे मोफत राज्यस्तरीय मराठा वधू – वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याला समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, ऑनलाइन प्रक्रियाद्वारे 150 पेक्षा अधिक नाव नोंदणी झाली असून अजून 29तारखेपर्यंत लवकरात लवकर वधू- वर इच्छुकांनी नाव नोंदणी करावी तसेच मेळाव्याच्या दिवशी रविवारी सकाळी 09 ते 10 या वेळेत ऑफलाईन नाव नोंदणीची सवलत दिल्याने अजून जास्त प्रमाणात नावनोंदणी होणार आहे. नोंदणी विभागाची जबाबदारी समाजातील प्राध्यापक व शिक्षक व पत्रकार मंडळींनी स्वीकारली असून बाहेर गावाहून येणार्‍या पालक आणि मुला-मुलींना अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळावा यशस्वीतेसाठी नाव नोंदणी, समन्वयक, ऑनलाईन नोंदणी टीम, भोजन व्यवस्था, बायोडाटा वाचक, नियोजन, देखरेख समिती, अशा विविध समित्या काम करत आहेत. मेळाव्यात नोंदणीकृत प्रत्येक मुलामुलींचा बायोडाटा वाचन व्हावा यासाठी अचूक नियोजनाचे काम चालू असल्याचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. तानाजी बापु जंजिरे यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना इंजि.जंजिरे बप्पू म्हणाले की, मराठा सेवा संघ आष्टीच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी समाजातील सर्व स्तरातील बांधव यथाशक्ती यथोचित योगदान देत असून, हा मेळावा राज्यातील मराठा समाजाला दिशादर्शक ठरेल असा विश्‍वास व्यक्त केला आहे. इच्छुक उपवर झालेल्या मुलामुलींना मेळाव्यात सहभागी व्हायचे असेल तर, रविवारी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 09 ते 10 या वेळेत कडा धामणगाव रोडवर परमेश्‍वर मंगल कार्यालय कडा येथे चार बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो सह नाव नोंदणी करावी असे आवाहन मराठा सेवा संघाच्यावतीने करण्यात येत आहे. मेळाव्यासाठी येणार्‍या फक्त नोंदणीकृत मुला मुलींनाच प्रवेश दिला जाईल एकट्या पालकाला प्रवेश दिला जाणार नाही. पालक आणि मुलगा / मुलगी बरोबर येणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत असल्याशिवाय सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी. नियमांचे पालन करून या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करावे. मुलगा / मुलगी, पालक सोबत असतील तरच प्रवेश मिळेल अथवा प्रवेश मिळणार नाही यांची दक्षता घ्यावी असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे या मेळाव्याचे आयोजन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तानाजी बप्पू जंजिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वधू- वर कक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाचे, पत्रकार सीताराम पोकळे यांच्यासह शिवश्री लक्ष्मण रेडेकर, भास्कर निंबाळकर, सुरेश पवार सर, बन्सीधर मोरे, इंजि. प्रल्हाद तळेकर, प्रा. डॉ. दत्तात्रय नरसाळे, प्रा.डॉ. बाबासाहेब मुटकुळे , प्रा. डॉ. टाळके ए. बी., दिनेश पोकळे (सर), इंजि. तात्यासाहेब पोकळे, डॉ. राजकुमार थोरवे, सुनिल तरटे (सर), अशोक उढाणे (सर), विष्णू वाघ, आबासाहेब खिलारे (ग्रामविकास अधिकारी), शिवमती. छायाताई कदम आदी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी नियोजन करताना दिसत आहेत

COMMENTS