Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

पाथर्डी ः बाबूजी आव्हाड महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहा

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राबवली स्वच्छता मोहीम
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या तब्बल 109 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड

पाथर्डी ः बाबूजी आव्हाड महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. कलाम यांचे विचार विद्यार्थ्याना कायम प्रेरित करतात. विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन आवश्यक आहे.
याच अनुषंगाने विद्यार्थ्याला अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी हे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिवसाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. शालेय पुस्तकी वाचन सोबत अवांतर पुस्तके वाचणे आवश्यक आहे.त्यासाठी महाविद्यालयातील ग्रंथालयामार्फत अवांतर पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.सदर पुस्तकामध्ये थोर व्यक्तींची आत्मचरित्र, प्रेरणादायी कथा यांचा समावेश करण्यात आला.विद्यार्थ्यानी वाचनाचा आनंद घेउन आपली पुस्तकांसंबंधी मते व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सलिम शेख होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मन्सूर शेख यांनी तर आभार प्रा. महारुद्र घुले यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल डॉ. किरण गुलदगड, प्रा. शेखर ससाणे, प्रा. सुनील कचरे, प्रा. खंडेराव डोईफोडे, प्रा. सुरेखा चेमटे, प्रा. अनिल नारखेडे, प्रा. अरुण नेहुल, प्रा.इंद्रजीत बोरले प्रा.सुधीर सूडके,प्रा. जयश्री दहिफळे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS