Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुंगीचे औषध घालून महाविद्यालयीन तरुणीवर कब्बडीपटूचा बलात्कार

इस्लामपूर / प्रतिनिधी : येडेमछिंद्र (ता. वाळवा) येथील महाविद्यालयीन तरुणीच्या जेवणात गुंगीचे औषध घालून वारंवार बलात्कार करून त्याचे चित्रण करून ध

प्रकाश हॉस्पिटलवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना : निशिकांत पाटील
सांगली जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा देणार : ना. अजित पवार
पन्हाळ्यावर सापडला आणखी एक तोफगोळा

इस्लामपूर / प्रतिनिधी : येडेमछिंद्र (ता. वाळवा) येथील महाविद्यालयीन तरुणीच्या जेवणात गुंगीचे औषध घालून वारंवार बलात्कार करून त्याचे चित्रण करून धमकवल्या प्रकरणी यातील संशयित कब्बडीपटू अतुल बाजीराव पाटील (वय 42) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
याबाबत पोलिसांकडून मिळाळलेली अधिक माहिती अशी की, अतुल पाटील यांचे त्या तरुणीच्या घरी येणे जाणे होते. त्याने बिर्याणीमधून गुंगीचे औषध दिल्याने ती बेशुध्द पडली. याचा फायदा उठवत संशयिताने तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेचे त्याने फोटो व चित्रीकरण केले. या घटनेनंतर संशयित पीडीत मुलीला वरचेवर धमकावून फोटो व व्हिडिओ शुटींग व्हायरल करण्याची अशी धमकी देत होता. ही भीती दाखवून संशयित वारंवार मुलीवर बलात्कार करत होता. हा प्रकार सन 2019 पासून सुरु होता. अखेर पीडित मुलीने माहिती घरच्या लोकांना दिली त्यांनी मुलीला घेऊन इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संशयित अतुल हा एके काळचा कब्बडीचा स्टार खेळाडू आहे.

COMMENTS