Homeताज्या बातम्यामनोरंजन

रणबीर-रश्मिकाच्या ‘अ‍ॅनिमल’ने केली तीन दिवसांत केली 200 कोटींपेक्षा जास्त कमाई

मुंबई प्रतिनिधी - ‘ॲनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. सध्या ह्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरु

बारावीचे निकाल उद्या जाहीर होणार
आ.ससाने कडून ग्रामीण भागातील रस्त्याची पाहणी
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ ७५ रुपयाचे नाणे लाँच करणार

मुंबई प्रतिनिधी – ‘ॲनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. सध्या ह्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरु आहे. नुकताच १ डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला आहे.

पहिल्या दिवसापासूनच अनेक चित्रपटांची रेकॉर्डब्रेक कमाई करत ह्या चित्रपटाने आपल्या नावावर रेकॉर्ड तयार केला आहे. रिलीज झाल्यानंतर तीन दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. चला तर जाणून घेऊया, चित्रपटाने तिसऱ्या किती कमाई केली आहे. फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर, अनेक सेलिब्रिटींकडूनही आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दमदार ॲक्शन, उत्तम कथा, अफलातून व्हिएफएक्स आणि कलाकारांचा अभिनय असा मिलाप असलेल्या या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. सर्वच कलाकारांच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झालेली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच २०० कोटींचा टप्पा गाठला आहे. पहिल्या दिवशी ६३ कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी ६६.२७ कोटी तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ७२. ५० कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवसाचा कमाई आकडा पाहता चित्रपटाने रविवारी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. 

COMMENTS