Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गुरु

राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
मराठी पाटी हवी म्हणजे हवी ः  राज ठाकरे
 अनेक मुद्द्यांवर शिष्टमंडळ घेऊन भेटलो आणि चर्चा झाली – राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता मनोहर जोशींचं निधन झालं. मनोहर जोशींच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही भावनिक पोस्ट लिहीत माजी मुख्यमंत्र्यांना अखेरचा निरोप देत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राज ठाकरेंनी बाळासाहेब आणि मनोहर जोशींच्या कनेक्शनसंदर्भातील उल्लेख आपल्या श्रद्धांजलीमध्ये केला आहे. “मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली,” असं म्हणत राज ठाकरेंनी श्रद्धांजली वाहताना सुरुवातीलाच मनोहर जोशी हे बाळासाहेबांचे निकटवर्तीय होते याकडे लक्ष वेधलं आहे. “शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले,” असंही राज यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे.

COMMENTS