Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

पुणे ः उष्णतेच्या तीव्रतेने राज्य हैराण झाले असून, जळगावमध्ये तापमान 48 अंशांवर पोहचले आहे, मात्र यातून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान

जागृती शुगर कडून 200 रुपयाचा हप्ता उस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा
अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल
सातारा ‘सिव्हिल’ला ट्रॉमा केअर युनिट मंजूर; महाविकास आघाडीची सत्ता जाता-जाता सातारकरांसाठी सुविधा

पुणे ः उष्णतेच्या तीव्रतेने राज्य हैराण झाले असून, जळगावमध्ये तापमान 48 अंशांवर पोहचले आहे, मात्र यातून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह उपगनरात आणि राज्यातील काही भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय येत्या 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याने मिळण्याची शक्यता आहे. पहाटेपासून उकाड्याची जाणीव होत असल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. दरम्यान, पुढील तीन-चार मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर आजपासून 4 दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, रत्नागिरी, रायगड, कोकण, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. अहमदनगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार दाखल – पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज आहे. याशिवाय जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. 10 ते 12 जूनला मुंबईत पावसाचे आगमन होणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

COMMENTS