Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर छापे

केंद्र सरकारचा जीएसटी कर थकवल्याप्रकरणी चौकशी

बीड/प्रतिनिधी ः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे, कारण परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागान

प्रहारच्या मदतीने मिळाले निराधार महिलेस घरकुल
अकोले तालुक्यात स्टार्टअप यात्रा उत्साहात
चोरीचा बनाव फसला…फिर्यादीच झाला आरोपी…

बीड/प्रतिनिधी ः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे, कारण परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा टाकण्यात आला. गुरूवारी सकाळपासून जीएसटी अधिकारी पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर पोहचले असून आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्या प्रकरणी ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आहे.
पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे. मात्र नेमकी कोणत्या कारणासाठी ही चौकशी सुरु आहे? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी ही कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर पंकजा मुंडे याच्या कारखान्यावर जीएसटी विभागाकडून कारवाई होत असल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील भगवानगडावर उपस्थित आहेत. मात्र दुसरीकडे परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे.
दरम्यान, या कारवाईबद्दल बोलतांना पकंजा मुंडे म्हणाल्या की, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या 6-7 वर्षांपासून नुकसानीत आहे. कसातरी आम्ही तो चालवत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची आम्ही काही दिवसांपूर्वी याच कारणाने भेट घेतली होती. यावेळी 4-5 काऱखान्यांचा प्रश्‍न मांडला होता. आम्हाला जीएसटी भरायचाय, लोन प्रलंबित आहे. कारखान्याचे जवळपास दोनशे-अडीचशे कोटी लोन आहे. आम्ही सव्वादोनशे कोटी कर्ज फेडले. आता पुन्हा तेवढेच आहे. या आजारी साखर कारखान्यांना मदत करा, अशी विनंती आम्ही केली होती. तरीदेखील जीएसटीने छापे टाकल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहेत.

वरून आदेश आल्याने कारवाई ः पंकजा मुंडे- यासंदर्भात बोलतांना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, या कारखान्याच्या जीएसटीबद्दलचा आमचा अंतर्गत वाद सुरु आहे. तो माध्यमांपर्यंत जाण्याचे काही कारण नव्हते. मात्र आज अचानक जीएसटीच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली. मीदेखील अधिकार्‍यांशी बोलले. पण तात्काळ कारवाई करण्याचे वरून आदेश होते, असे मला कळाले. तसेच त्यांच्याच वरील कार्यालयाकडून ही बातमी माध्यमांपर्यंत आधी पोहोचल्याचेही मला कळले हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

COMMENTS