Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुळजाभवानी मातेच्या कमानीमुळे राहुरीच्या वैभवात भर

राहुरी ः राहुरी शहराच्या प्रवेशद्वाराजवळच माहेरवाशीण तुळजाभवानी मातेची कमान लावल्याने राहुरी शहराच्या वैभवात भर पडणार आहे. नगर मनमाड रस्त्यावरील

कष्टप्रद जीवन हा रयतच्या शिक्षकांचा स्थायीभाव : नवनाथ बोडखे        
शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सुटण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन
चार महिलांमध्ये अस्वस्थता…धूमस्टाईल दागिने ओरबाडले

राहुरी ः राहुरी शहराच्या प्रवेशद्वाराजवळच माहेरवाशीण तुळजाभवानी मातेची कमान लावल्याने राहुरी शहराच्या वैभवात भर पडणार आहे. नगर मनमाड रस्त्यावरील कुलकर्णी हॉस्पिटल शेजारी शहराच्या प्रवेशद्वारावर राहुरी नगरपालिकेने स्वागत कमान लावली आहे . गेले अनेक दिवस त्याचे काम सुरू होते. या कमानीवर भव्य असे डिजिटल कुलस्वामिनी आई तुळजाभवानी प्रवेशद्वार अशी भव्य कमान सुशोभीकरणासह लावण्यात आली आहे.
कालपासून ही डिजिटल असणारी भवानी मातेची कमान राहुरी शहरवासीयांसह नगर मनमाड रस्त्यावरील नागरिकांचे व पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. काल आणि आज या ठिकाणी अनेक नागरिक सेल्फी काढत असल्याचे चित्र दिसून येत होते. राहुरी शहराच्या सुशोभीकरणासाठी राहुरी नगरपालिकेने ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे , बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नगरपालिके शेजारी एक स्वागत कमान (वेस), पाण्याच्या टाकी जवळ एक तर नगर मनमाड रस्त्यावर कुलकर्णी हॉस्पिटल शेजारील कमान अशा तीन कमानींचे काम सुरू होते. आता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची कमान सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे, तर अन्य कमानींचे काम कधी होणार? असा प्रश्‍न देखील राहुरी शहरवासीयांकडून संबंधित प्रशासनाकडे केला जात आहे.

COMMENTS