Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता नगरपरिषद विकास कामात राज्यात अव्वल राहील : पालकमंत्री विखे 

 राहाता : राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांपुढे विकासाचा अजेंडा  घेऊन गेलो. मतदारांनी विकास कामाला साथ देत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदा

वाळू माफियाप्रमाणे लँडमाफियांना महसूलमंत्री लगाम घालणार का ?
जिल्हा दुष्काळमुक्तीसाठी स्व. बाळासाहेब विखेंनी सातत्याने संघर्ष केला
संत ज्ञानेश्‍वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा त्वरित सादर करा

 राहाता : राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांपुढे विकासाचा अजेंडा  घेऊन गेलो. मतदारांनी विकास कामाला साथ देत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून  ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून यापुढील काळात राहाता नगरपरिषद विकास कामात राज्यात अव्वल क्रमांकावर राहील असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या पदाग्रहण समारंभ निमित्त केले.

राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देत मतदारांनी एकहाती सत्ता मिळून दिली. त्यानिमित्त शनिवारी सकाळी राहाता नगरपरिषदेत येथे महंत उद्धव महाराज मंडलिक व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना  मंत्री विखे पाटील म्हणाले काही वर्षांमध्ये या शहराच्या विकासामध्ये विकासाची गती मंदावली होती. परंतु प्रशासन काळात मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी  उत्तम काम केले. विकासाचा दृष्टिकोन असणारा अधिकारी असला तर योग्य प्रकारे विकास कामांना गती मिळते. त्यामुळे निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी त्यांचा देखील मोठा सहभाग आहे. सत्ता असो किंवा नसो राहाता शहराचा विकास करण्यासाठी आपण अविरतपणे विकास कामे सुरू ठेवले.

 यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, डॉ सुजय विखे पाटील व शालिनी विखे पाटील यांनी आम्हाला उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्याची संधी दिली. नगराध्यक्ष पदाची संधी ही केवळ सत्ता गाजवण्यासाठी नसून एक सेवेचे साधन आहे याची मला जाणीव आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता शहराचा विकास अधिक गतिमान होणार आहे.

   यावेळी प्रशासक माणिक आहेर, मुख्याधिकारी वैभव लोंढे, तहसीलदार अमोल मोरे, गटनेते शफिक शहा, नगरसेवक राहुल सदाफळ, प्रवीण बोरकर, अजय आग्रे, डॉ विजय सदाफळ व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

COMMENTS