Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात दोन गटात राडा

अकोला प्रतिनिधी - अकोलामध्ये रात्री दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. किरकोळ वादातून परिस्थिती इतकी बिघडली की दोन्ही गटां

अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार: मंत्री उदय सामंत
राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अतिक्रमणात असल्याचा अहवालात स्पष्ट उल्लेख
अनधिकृत संस्थांची ओळख पटवण्यासाठी ‘डिस्ट्रिक्ट मॅपिंग’ करणे आवश्यक : डॉ. नीलम गोऱ्हे

अकोला प्रतिनिधी – अकोलामध्ये रात्री दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. किरकोळ वादातून परिस्थिती इतकी बिघडली की दोन्ही गटांमध्ये राडा झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. या हिंसाचाराचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन गटातील लोक एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. यासोबतच ते वाहनांची तोडफोड करून गोंधळ घालत आहेत. जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात दोन गटांत शनिवारी रात्री ११:१५ वाजताच्या सुमारास वाद झाल्याने त्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यानंतर काही लोकांचा जमाव तेथील घरांवर चालून गेला. यावेळी एक गटाने तुफान दगडफेक करीत मोटारसायकलींचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, तर काही समाजकंटकांनी एक घर पेटवून दिले. या घटनेत एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका सोशल मीडिया ग्रुपवर एक पोस्ट आली. त्यामुळे वाद झाला आणि शेकडो लोक रस्त्यावर उतरले या लोकांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही तरुणांनी बाईक, गाड्या आणि दिसेल त्या ठिकाणी आगी लावत प्रचंड जाळपोळ केली. त्यामुळे अकोल्यात अधिकच तणाव पेटला. रात्री उशिरा हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे

COMMENTS