पुणे : समाजमाध्यमातील अनेक उच्चपदस्थ तसेच सामान्यांची सोशल मीडियावरील खाती सायबर चोरट्यांकडून हॅक केली जात आहेत. यात आता पुणे पोलिस दलातील गुन्हे

पुणे : समाजमाध्यमातील अनेक उच्चपदस्थ तसेच सामान्यांची सोशल मीडियावरील खाती सायबर चोरट्यांकडून हॅक केली जात आहेत. यात आता पुणे पोलिस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे समाज माध्यमातील खाते हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पुणे शहरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. समाज माध्यमात मैत्रीची विनंती पाठवून चोरटे नागरिकांची फसवणूक करतात. अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पोकळे यांचे समाज माध्यमातील खाते हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
COMMENTS